तरुण तेजपाल यांना दहा वर्षांची सक्तमजुरी

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी ‘तहेलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल यांना २०१३ मधील सहकाऱ्यावरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आहे.
तरुण तेजपाल यांना दहा वर्षांची सक्तमजुरी
तरुण तेजपाल यांना दहा वर्षांची सक्तमजुरी(संग्रहित छायाचित्र)
Published on

पणजी : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी ‘तहेलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल यांना २०१३ मधील सहकाऱ्यावरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आहे. उच्च न्यायालयाने ५ वर्षांपूर्वी गोवा सत्र न्यायालयाने दिलेल्या तेजपाल यांच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय रद्दबातल ठरवला आणि त्यांना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

न्या. नीला गोखले आणि न्या.अमित जमसांडेकर यांच्या खंडपीठाने सुरुवातीला तेजपाल यांना दोन आठवड्यांत शरण येण्याचे निर्देश दिले होते. परंतु, त्यांच्या वकिलांच्या विनंतीनंतर न्यायालयाने ही मुदत चार आठवड्यांपर्यंत वाढवून दिली आहे.

न्यायालयाने किमान शिक्षेची तरतूद लागू करताना स्पष्ट केले की, ही घटना १३ वर्षांपूर्वी घडली होती आणि त्यानंतर तेजपाल यांनी कोणताही नवीन गुन्हा केलेला नाही. दोन्ही पक्षकार (पीडिता आणि तेजपाल) आता आयुष्यात पुढे गेले असण्याची शक्यता आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

शिक्षेसोबतच न्यायालयाने तेजपाल यांना १०,२१,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही संपूर्ण दंडाची रक्कम पीडितेला भरपाई म्हणून दिली जाईल. न्यायालयाने म्हटले की, लैंगिक अत्याचाराची शिकार झालेल्या पीडितेला या दंडाची संपूर्ण रक्कम हस्तांतरित करण्यात यावी.

आपण या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत असे तरुण तेजपाल यांनी म्हटले आहे

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in