पुढील २४ तासांत अतिरिक्त कर लादणार; ट्रम्प यांची भारताला पुन्हा धमकी

भारत व्यापारासाठी चांगला भागीदार नाही, कारण भारत अद्याप रशियाकडून तेल खरेदी करत आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत भारतावर आणखी अतिरिक्त ‘टॅरिफ’ लादले जाईल, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दिली.
डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्पसंग्रहित छायाचित्र
Published on

न्यूयॉर्क : भारत व्यापारासाठी चांगला भागीदार नाही, कारण भारत अद्याप रशियाकडून तेल खरेदी करत आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत भारतावर आणखी अतिरिक्त ‘टॅरिफ’ लादले जाईल, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दिली.

‘सीएनबीसी’च्या ‘स्क्वॉक बॉक्स’ कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले, “भारताविषयी लोक बोलायला टाळतात, पण तो सर्वाधिक आयात शुल्क आकारणारा देश आहे. ते सर्वांवर मोठ्या प्रमाणावर ‘टॅरिफ’ लावतात. भारत हा चांगला व्यापार करणारा देश नाही. ते आमच्यासोबत भरपूर व्यापार करतात, पण आम्हाला त्यांच्यासोबत व्यापार करताना कमी हिस्सा मिळतो. कारण भारताचे टॅरिफ जास्त आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर २५ टक्के ‘टॅरिफ’ लावणार आहोत. तसेच येत्या २४ तासांत आम्ही भारतावर अतिरिक्त ‘टॅरिफ’ही लादू. कारण ते रशियाकडून तेल खरेदी करत आहेत. भारत हा युक्रेन युद्धाला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देत आहे. जर ते असेच करणार असतील तर मला आनंद होणार नाही, असे ते म्हणाले. भारतातून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या औषधांवर पहिल्यांदा १५० टक्के त्यानंतर २५० टक्के ‘टॅरिफ’ लावले जाऊ शकते, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. पण, औषधांवर प्रारंभी किती ‘टॅरिफ’ लावणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. पुढील आठवड्यात सेमीकंडक्टर व चीप्सवर ते ‘टॅरिफ’ची घोषणा करणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in