एच-१बी व्हिसा रद्द करण्याबाबत अमेरिकेतील महिला खासदाराची पोस्ट; भारतीयांची चिंता वाढली

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याच सरकारमधील एका महिला खासदाराने भारतीय विद्यार्थी किंवा नोकरीसाठी इच्छुक तरुणांना दिला जाणाऱ्या एच-१बी व्हिसा रद्द करण्याबाबत भाष्य केल्याने अमेरिकेतील अथवा तेथे जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांच्या चिंता वाढल्या आहेत.
एच-१बी व्हिसा रद्द करण्याबाबत अमेरिकेतील महिला खासदाराची पोस्ट; भारतीयांची चिंता वाढली
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याच सरकारमधील एका महिला खासदाराने भारतीय विद्यार्थी किंवा नोकरीसाठी इच्छुक तरुणांना दिला जाणाऱ्या एच-१बी व्हिसा रद्द करण्याबाबत भाष्य केल्याने अमेरिकेतील अथवा तेथे जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांच्या चिंता वाढल्या आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांमध्ये कोट्यवधी भारतीयांची नाराजी ओढवून घेतली आहे. अमेरिकेकडून भारतावर आधी २५ टक्के, त्यावर दंडात्मक टॅरिफ लागू करण्यात आले. त्यानंतर सोमवारी आणखी टॅरिफ लागू करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली.

अमेरिकन खासदार मारजोरिया टेलर ग्रीन यांनी सोमवारी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे भारतीयांना दिल्या जाणाऱ्या व्हिसाचा मुद्दा चर्चेत आला आहे. अमेरिकेत शिकण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना एच-१बी व्हिसा दिला जातो. मात्र हा व्हिसा देणे बंद केले जावे, अशी मागणी या महिला खासदाराने केली आहे. त्यामुळे टॅरिफ अस्रानंतर आता डोनाल्ड ट्रम्प भारताविरोधात व्हिसाचे शस्त्र वापरणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हटलंय मारजोरिया टेलर ग्रीन यांनी सोशल पोस्टमध्ये?

ग्रीन यांनी सोमवारी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ वाढवण्यासंदर्भात केलेली पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी स्वत:चा एक मेसेज लिहिला आहे. टॅरिफऐवजी अमेरिकन नोकऱ्या करण्यासाठी भारतीयांना दिले जाणारे एच-१बी व्हिसा रद्द करा, अशी पोस्ट ग्रीन यांनी केली आहे.

त्यासोबतच युक्रेन-रशिया युद्धासाठी अर्थसहाय्य व शस्त्रास्रांची मदत बंद करण्याचेही आवाहन ग्रीन यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in