वैष्णोदेवी यात्रा पूर्णपणे थांबवली; भाविकांना परत जाण्याचे आवाहन

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड आणि कठुआमध्ये झालेली ढगफुटी तसेच भूस्खलनाच्या सततच्या घटनांमुळे जम्मूच्या कटरा येथे वैष्णोदेवीची यात्रा पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. भाविकांना परत जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वैष्णोदेवी यात्रा पूर्णपणे थांबवली; भाविकांना परत जाण्याचे आवाहन
Photo : ANI
Published on

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड आणि कठुआमध्ये झालेली ढगफुटी तसेच भूस्खलनाच्या सततच्या घटनांमुळे जम्मूच्या कटरा येथे वैष्णोदेवीची यात्रा पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. भाविकांना परत जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याठिकाणी नवीन प्रवाशांना यात्रेसाठी प्रवेश मिळू नये म्हणून ट्रॅव्हल स्लिप काऊंटरदेखील बंद करण्यात आले आहेत. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने कटरा बाजारात फिरण्यासही बंदी घातली आहे. यात्रेसाठी आधीच निघालेल्या भाविकांनाही लवकरात लवकर कटरा येथे परतण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी कोणत्याही अनुचित घटना टाळता याव्यात, यासाठी लाऊडस्पीकरद्वारे सतत घोषणा दिल्या जात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in