

आजच्या डिजिटल युगात एखादी हटके गोष्ट लोकांच्या नजरेत येण्यासाठी फार वेळ लागत नाही. काही वेगळं दिसलं की लगेच त्या घटनेचा फोटो आणि व्हिडिओ शूट केला जातो. त्यानंतर काही मिनिटांत तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. सध्या इंस्टाग्रामवर असाच एक लग्नसोहळ्यातील अनोखा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
लग्नात 'पेट्रोल पंप' ची एंट्री!
आपण पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरताना पाहिलेच आहे. पण एखाद्या लग्नसमारंभात पेट्रोल पंपासारखी मशीन दिसली, तर? सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लग्नाच्या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या धर्तीवर "ड्रिंक स्टेशन" उभारण्यात आले आहे.
या मशीनमध्ये पेट्रोलऐवजी ज्यूस भरलेला आहे. अगदी पेट्रोल टाकीत इंधन भरल्यासारख्याच पद्धतीने नळीतून ग्लासमध्ये पेय ओतले जात आहे. या अनोख्या कल्पनेने पाहुण्यांसह नेटिझन्सचेही लक्ष वेधून घेतले आहे.
इंस्टाग्रामवर व्हिडिओला लाखो लाईक्स
हा व्हिडिओ ajayupadhyay5837 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत २.५२ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
एका युजरने लिहिले, "पेट्रोल पंपवाल्याच्या मुलाचा आज तिलक समारंभ आहे बहुतेक!" दुसऱ्याने कमेंट केली, "हा पेट्रोल पंप नाही, हा ज्यूस पंप आहे!" तर आणखी एकाने विचारले आहे, "किती लिटर भरून द्यायचे?" काहींनी तर "झिरो तपासला का आधी?" अशी खिल्ली उडवली आहे.
लग्नसोहळ्यांतील वाढता क्रिएटिव्ह ट्रेंड
सध्याचे लग्नसोहळे थीमवर आधारित होताना दिसत आहेत. लाईव्ह फूड काउंटर, डेजर्ट वॉल, कस्टमाइज्ड बेव्हरेज बार यांसारख्या संकल्पनांनंतर आता 'ज्यूस पंप'सारख्या कल्पना पाहुण्यांसाठी खास आकर्षण ठरत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आणि पाहुण्यांना वेगळा अनुभव देण्यासाठी आयोजक नवनवीन प्रयोग करत आहेत. सध्या तरी या 'ड्रिंक पंप'ने इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.