
हल्ली सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अनेकजण धुमाकूळ घालताना दिसतात. फक्त व्ह्यूज आणि लाइक्ससाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. मंदिर, देवळं, पवित्र स्थळं हेही आता रील बनवण्यासाठीचे 'लोकेशन्स' झाले आहेत. त्यासोबतच देवाचे सोशल मीडियापूरते भक्तही तयार झाले आहेत. अशाच एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हालाही पोट धरून हसू येईल.
हा व्हिडिओ ‘कुंभकरण’ नावाच्या युजरने 'X' वर पोस्ट केला आहे. व्हिडिओत एक महिला पिवळ्या साडीमध्ये, मोकळे केस सोडून, महादेवाच्या पिंडीजवळ एका गाण्यावर नृत्य करत Reel शूट करताना दिसते. रील करत असतानाच तिचा अचानक तिचा तोल जातो आणि ती थेट बाजूच्या तळ्यात जाऊन पडते! “महादेवने भक्ति का फल तुरंत दे दिया'' असं या व्हिडिओला caption देण्यात आली आहे.
पाहा व्हिडिओ -
हा प्रसंग इतका मजेशीर आहे की नेटकऱ्यांनी लगेचच त्यावर विनोदी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अशा प्रकारच्या घटनांमुळे एक बाब मात्र अधोरेखित होते, प्रसिद्धीच्या नादात अनेकदा लोक सुरक्षिततेचा विचारही करत नाहीत. रील बनवणं आजच्या पिढीसाठी आकर्षण ठरलं असलं, तरी हे करताना जागेची पवित्रता, इतरांची भावना आणि स्वतःची सुरक्षितता याचं भान ठेवणं आवश्यक आहे.