४ वर्षांपासून फरार आरोपी अखेर अटकेत

या हत्या प्रकरणानंतर राकेश कोळी फरार झाला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने या हत्या प्रकरणाचा तपास करत विक्की देशमुखच्या मुसक्या आवळल्या होत्या.
४ वर्षांपासून फरार आरोपी अखेर अटकेत

नवी मुंबई : कुख्यात गुन्हेगार विक्रांत उर्फ विक्की देशमुख याचा महत्वाचा साथिदार व नेरुळ मधील सचिन गर्जे हत्या प्रकरणात मागील ४ वर्षांपासून फरार असलेला आरोपी राकेश जनार्दन कोळी (३१) या आरोपीला गुन्हे शाखेने शनिवारी गव्हाणगाव येथून अटक केली आहे. गुन्हे शाखेने अतापर्यंत विकी देशमुख टोळीतील १६ आरोपींना अटक केली असून, राकेश कोळी हा १७ वा आरोपी आहे.

आरोपी राकेश कोळी हा कुख्यात गुन्हेगार विक्की देशमुख याचा राईट हँड होता. सफ्टेंबर २०१९ मध्ये विक्की देशमुख, राकेश कोळी व त्याच्या इतर साथिदारांनी नेरुळ मधील सचिन गर्जे याचे अपहरण करून त्याची हत्या केली होती. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. या हत्या प्रकरणानंतर राकेश कोळी फरार झाला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने या हत्या प्रकरणाचा तपास करत विक्की देशमुखच्या मुसक्या आवळल्या होत्या.

त्यानंतर गुन्हे शाखेने विक्की देशमुखचे साथीदार व नातेवाईक अशा एकुण १६ आरोपींना आतापर्यंत जेरबंद करुन त्याची उरण परिसरातील हदशत संपवून टाकली होती; मात्र विक्की देशमुखचा महत्वाचा सहकारी राकेश कोळी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. शनिवारी रात्री तो गव्हाणगाव येथे आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी आला असताना, गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, पोलीस उपनिरीक्षक देसाई व त्यांच्या पथकाने सापळा लावून राकेश कोळी याला अटक केली आहे.

विकी देशमुख व त्याच्या टोळीवर दाखल गुन्हे

कुख्यात गुन्हेगार विकी देशमुख याच्या विरोधात नवी मुंबईसह विविध भागात खुन, खंडणीसाठी धमकावणे, अपहरण, खुनाचा प्रयत्न, बलात्कार अशा विविध प्रकारचे ३८ गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबई पोलिसांनी अतापर्यंत विक्की देशमुखसह त्याच्या टोळीतील एकुण १७ आरोपींना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी विकी देशमुख आणि त्याच्या टोळीवर ८ गुन्ह्यांमध्ये मोक्कातंर्गत कारवाई करून त्याच्या टोळीचा बमोड केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in