चिराग लोके हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत

चिरागने सदरचे काम सोडावे, यासाठी त्याला धमकावण्यात देखील आले होते. मात्र त्यानंतर देखील चिरागचे सदर माथाडी साईटवरील काम मिळवण्याचे प्रयत्न सुरूच होते.
चिराग लोके हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत
Published on

नवी मुंबई : मानखुर्द येथील माथाडी साईट मिळविण्याच्या वादातून नेरूळमध्ये राहणाऱ्या चिराग महेश लोके (३०) या गुंडाची निर्घुणपणे हत्या करून फरार झालेल्या मारेकऱ्यांपैकी एकाला नेरूळ पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली आहे. अरबाज शेख असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी या हत्या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे.

नेरूळ सेक्टर-२० मध्ये राहणारा चिराग लोके व त्याची हत्या करणारा आरोपी अरविंद सोडा या दोघांमध्ये मानखुर्द येथील माथाडी साईटचे काम मिळविण्यावरून मागील काही महिन्यांपासून वाद सुरू होता. चिरागने सदरचे काम सोडावे, यासाठी त्याला धमकावण्यात देखील आले होते. मात्र त्यानंतर देखील चिरागचे सदर माथाडी साईटवरील काम मिळवण्याचे प्रयत्न सुरूच होते. त्यामुळे अरविंद सोडा व त्याच्या पाचसहा साथीदारांनी त्याचा कायमचा काटा काढण्यासाठी गत मंगळवारी सांयकाळी चिरागला त्याच्या घराजवळ गाठून त्याच्यावर लोखंडी रॉड व इतर हत्याराने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये चिरागचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी प्रियंका गंभीर जखमी झाली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in