Navi Mumbai : पाडकाम रोखण्यासाठी कोर्टाचा बनावट आदेश बनवला; न्यायाधीशांचीच केली हुबेहूब खोटी सही, CBD पोलिसांत गुन्हा दाखल

महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर होणारी पाडकामाची कारवाई रोखण्यासाठी बेलापूर न्यायालयाचा बनावट स्थगिती आदेश तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Navi Mumbai : पाडकाम रोखण्यासाठी कोर्टाचा बनावट आदेश बनवला; न्यायाधीशांचीच केली हुबेहूब खोटी सही, CBD पोलिसांत गुन्हा दाखल
Navi Mumbai : पाडकाम रोखण्यासाठी कोर्टाचा बनावट आदेश बनवला; न्यायाधीशांचीच केली हुबेहूब खोटी सही, CBD पोलिसांत गुन्हा दाखल
Published on

नवी मुंबई : महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर होणारी पाडकामाची कारवाई रोखण्यासाठी बेलापूर न्यायालयाचा बनावट स्थगिती आदेश तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिली नसताना, मूळ आदेशाच्या सर्टिफाइड कॉपीमध्ये फेरफार करून, न्यायाधीशांची बनावट स्वाक्षरी करून हा खोटा दस्तावेज तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. सीबीडी पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

नेरुळच्या सारसोळे गावातील तळमजला अधिक ५ मजली इमारतीबाबत हा वाद सुरू आहे. सदर बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत मनपाने मालमत्ताधारक बेबीबाई मधुकर ठाकूर यांना २२ एप्रिल २०२६ रोजी एमआरटीपी कायद्यान्वये पाडकामाची नोटीस बजावली होती. याविरोधात बेबीबाई ठाकूर यांनी बेलापूर न्यायालयात दावा दाखल करून पाडकामावर स्थगिती मागितली होती. बेलापूर न्यायालयात या प्रकरणावर ७ मे आणि १२ जून २०२६ रोजी सुनावणी झाली. दोन्ही वेळेस दिवाणी न्यायाधीश विनायक विश्वास यांनी बेबीबाई ठाकूर यांना पाडकामाविरुद्ध हंगामी दिलासा किंवा स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला होता.

एका अज्ञात व्यक्तीने नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्या व्हॉट्सॲपवर न्यायालयाने पाडकामाला स्थगिती दिल्याची बनावट ऑर्डर पाठवली. आयुक्तांनी सदर फाइल मनपाच्या विधी विभागाकडे पाठवल्यानंतर महापालिकेचे वकील ॲड. शैलेश यादव यांनी १५ जून २०२६ रोजी न्यायालयाच्या मूळ रेकॉर्डची पडताळणी केली असता, कोर्टाने असा स्थगिती आदेश दिलाच नसल्याचे उघड झाले.

Navi Mumbai : पाडकाम रोखण्यासाठी कोर्टाचा बनावट आदेश बनवला; न्यायाधीशांचीच केली हुबेहूब खोटी सही, CBD पोलिसांत गुन्हा दाखल
Thane : 'रस्त्यावर थुंकू नका' म्हटल्याचा राग; परप्रांतीय कॅबचालकाकडून वृद्धाला जबर मारहाण, संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवून या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. बेलापूर न्यायालयाच्या सहायक अधीक्षक प्रिया पाटील यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

न्यायालयाने घेतली स्वत:हून दखल

न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन तपासणी केली असता, उमेश राठोड नामक व्यक्तीने न्यायालयाच्या मूळ आदेशाची सर्टिफाइड कॉपी काढल्याचे व त्याच कॉपीवर फेरफार केल्याचे आढळले. बेबीबाई ठाकूर यांच्या आडनावावर पेनाने रेघा मारून तिथे 'तांडेल' असे लिहिल्याचे, तसेच कोर्टाच्या आदेशाच्या डाव्या बाजूला इंग्रजी मजकूर टाकून स्थगिती मिळाल्याचे भासवले.

तो व्हॉट्सॲप नंबर कोणाचा?

महापालिका आयुक्तांना ज्या मोबाईल क्रमांकावरून कोर्टाची बनावट ऑर्डर कॉपी पाठवली. तो ट्रु-कॉलरवर सदर नंबर तपासला असता सदर नंबर सागर नाईक या व्यक्तीच्या नावाने असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा व्हॉट्सॲप नंबर नेमका कोणाचा आहे, तो कोणी वापरला आणि या संपूर्ण बनावट आदेशाच्या षडयंत्रामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in