Navi Mumbai Airport : 'पिंगा'च्या तालावर थिरकल्या तिरंगी पताका; स्वातंत्र्यदिनाची भन्नाट सजावट सोशल मीडियावर व्हायरल; VIDEO

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्वातंत्र्यदिनाची अनोखी सजावट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. छताला लावलेल्या तिरंगी पताका चक्क गाण्याच्या तालावर फिरताना दिसत आहेत. तंत्रज्ञान आणि संगीताच्या या भन्नाट कॉम्बिनेशनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Navi Mumbai Airport : 'पिंगा'च्या तालावर थिरकल्या तिरंगी पताका; स्वातंत्र्यदिनाची भन्नाट सजावट सोशल मीडियावर व्हायरल; VIDEO
Navi Mumbai Airport : 'पिंगा'च्या तालावर थिरकल्या तिरंगी पताका; स्वातंत्र्यदिनाची भन्नाट सजावट सोशल मीडियावर व्हायरल; VIDEO
Published on

भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही खास सजावट करण्यात आली आहे. मात्र, ही सजावट नेहमीसारखी फक्त तिरंगी रंगांनी केलेली नाही. इथे छताला लावलेल्या तिरंगी पताका संगीताच्या तालावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे विमानतळाचा हा सुंदर नजारा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

गाणं सुरू होताच तिरंगी पताकांचे ‘लयबद्ध’ नृत्य

ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर @viharini_the_traveller यांनी या अनोख्या सजावटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये विमानतळाच्या छताला भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगांच्या अनेक पताका लावलेल्या दिसतात. विशेष म्हणजे या पताका एका लयीत फिरताना दिसत आहेत.

या सजावटीसोबत बाजीराव मस्तानी चित्रपटातील ‘पिंगा गं पोरी’ हे गाणं ऐकायला येतं. गाण्याच्या तालावर तिरंगी पताकांची होणारी हालचाल पाहायला खूपच आकर्षक वाटते. साधी सजावट, त्याला तंत्रज्ञानाची जोड आणि त्यावर संगीत असा हा प्रयोग प्रवाशांचं लक्ष वेधून घेत आहे.

व्हिडीओ शेअर करताना विहारिनी यांनीही या सजावटीचं कौतुक केलं आहे. “सजावट साधी आहे, पण खूपच सुंदर आहे. तंत्रज्ञान आणि संगीताचा अप्रतिम वापर करण्यात आला आहे. मात्र, हा नजारा पाहताना तुमची फ्लाइट चुकणार नाही याची काळजी घ्या,” अशा आशयाची मजेशीर प्रतिक्रिया त्यांनी दिली.

‘खूप सुंदर डिझाइन’, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही या अनोख्या सजावटीचं कौतुक केलं आहे. अनेकांनी तंत्रज्ञानाचा कल्पक वापर केल्याचं सांगत या प्रयोगाचं कौतुक केलं.

एका युजरने “तुमच्यामुळे आम्हाला हे पाहायला मिळालं,” अशी प्रतिक्रिया देत व्हिडीओ शेअर करणाऱ्या विहारिनी यांचे आभार मानले. तर आणखी एका युजरने “खूप सुंदर डिझाइन केलं आहे. व्वा!” अशी प्रतिक्रिया दिली.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने करण्यात आलेली ही तिरंगी सजावट विमानतळाच्या वातावरणातही वेगळाच उत्साह निर्माण करत आहे. विशेष म्हणजे, संगीताच्या तालावर फिरणाऱ्या या ‘तिरंग्यां’चा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही हा प्रयोग चांगलाच भावला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in