Navi Mumbai : नको असलेल्या अर्भकाची आईने केली हत्या; निर्दयी मातेला पोलिसांनी केली अटक

पोटच्या पाच दिवसांच्या अर्भकाची आईनेच गळा दाबून निर्घृण हत्या केल्याची घटना तुर्भे येथील खैरणे एमआयडीसी परिसरातील श्रमिकनगरमध्ये उघडकीस आली आहे.
Navi Mumbai : नको असलेल्या अर्भकाची आईने केली हत्या; निर्दयी मातेला पोलिसांनी केली अटक
Navi Mumbai : नको असलेल्या अर्भकाची आईने केली हत्या; निर्दयी मातेला पोलिसांनी केली अटक
Published on

नवी मुंबई : पोटच्या पाच दिवसांच्या अर्भकाची आईनेच गळा दाबून निर्घृण हत्या केल्याची घटना तुर्भे येथील खैरणे एमआयडीसी परिसरातील श्रमिकनगरमध्ये उघडकीस आली आहे. अश्विनी योगेश चंदनशिवे असे या निर्दयी मातेचे नाव असून तुर्भे पोलिसांनी तिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

या घटनेतील आरोपी महिला अश्विनी चंदनशिवे ही पुन्हा गरोदर राहिली होती. मात्र तिला हे दुसरे बाळ नको असल्याने तिने गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधला होता. परंतु, गर्भधारणा प्रगत अवस्थेत असल्याने डॉक्टरांनी कायद्यानुसार व सुरक्षेच्या कारणास्तव गर्भपात करण्यास स्पष्ट नकार दिला. इच्छा नसतानाही तिला हा गर्भ वाढवावा लागला होता.

Navi Mumbai : नको असलेल्या अर्भकाची आईने केली हत्या; निर्दयी मातेला पोलिसांनी केली अटक
Mumbai दुधासाठी रडणाऱ्या चिमुरड्याला दारावर आपटले; ४ वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी वडील अटकेत

सोमवारी दुपारी नणंदेच्या घरी असताना, आरोपी अश्विनी हिला दुसरे बाळ सांभाळायचे नसल्याने तिने ५ दिवसांच्या अर्भकाचा गळा दाबून त्याला जीवे मारले. बाळाची हालचाल होत नसल्याचे नणंदेच्या लक्षात येताच तिने अश्विनीकडे विचारपूस केली. त्यावेळी अश्विनीने आपणच बाळाची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली.

logo
marathi.freepressjournal.in