Navi Mumbai : सीबीडीत वाहनाच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू

सायन-पनवेल मार्गावरील सीबीडी बेलापूर येथील खिंडीत स्कुटीचालकाला अज्ञात वाहनाने धडक दिली.
Navi Mumbai : सीबीडीत वाहनाच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू
Navi Mumbai : सीबीडीत वाहनाच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू
Published on

नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावरील सीबीडी बेलापूर येथील खिंडीत स्कुटीचालकाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात स्कुटीचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घटली. अपघातानंतर धडक देणारा वाहन चालक पळून गेला असून सीबीडी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे.

या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव शैलेंद्र परमहंस सिंग असे नाव असून तो वाशी सेक्टर-१ मध्ये शिवासाई सोसायटीतील बिल्डिंग नं. १९ मध्ये राहत होता. शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास शैलेंद्र आपल्या स्कुटीवरून कामानिमित्त सीबीडी बेलापूर येथे जात होता. यावेळी तो सायन-पनवेल मार्गावरील उरण फाटा येथील उड्डाणपूल ओलांडून सीबीडी खिंडीत आला असताना, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने शैलेंद्रच्या स्कुटीला जोरदार धडक दिली.

Navi Mumbai : सीबीडीत वाहनाच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू
Navi Mumbai : रॅपिडोच्या नावाखाली दुचाकी चोरणारा जेरबंद; ५ मोटारसायकलींसह २ मोबाईल जप्त करत ७ गुन्हे उघडकीस

त्यामुळे शैलेंद्र गंभीर जखमी झाल्याने त्याचा काही वेळात मृत्यू झाला. यावेळी शैलेंद्रला धडक देणाऱ्या वाहनचालकाने त्याला कुठल्याही प्रकारची मदत न करता, घटनास्थळावरून पलायन केले. या अपघाताची माहिती मिळताच सीबीडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शैलेंद्रचा मृतदेह ताब्यात घेतला.

या अपघातानंतर पळून गेलेल्या अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in