उरणमध्ये हॉटेल व्यावसायिकांना लाकडी चुलीचा आधार; व्यावसायिक सिलिंडरवर निर्बंध, आंतरराष्ट्रीय तणावाचा फटका थेट सर्वसामान्यांच्या पोटाला

उरण येथे गॅसटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले असून, हॉटेल आणि धाबा व्यावसायिकांना पुन्हा जुन्या लाकडी चुलीचा आधार घ्यावा लागत आहे.
उरणमध्ये हॉटेल व्यावसायिकांना लाकडी चुलीचा आधार; व्यावसायिक सिलिंडरवर निर्बंध, आंतरराष्ट्रीय तणावाचा फटका थेट सर्वसामान्यांच्या पोटाला
उरणमध्ये हॉटेल व्यावसायिकांना लाकडी चुलीचा आधार; व्यावसायिक सिलिंडरवर निर्बंध, आंतरराष्ट्रीय तणावाचा फटका थेट सर्वसामान्यांच्या पोटाला'एआय' ने बनवलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

राजकुमार भगत / उरण

उरण येथे गॅसटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले असून, हॉटेल आणि धाबा व्यावसायिकांना पुन्हा जुन्या लाकडी चुलीचा आधार घ्यावा लागत आहे. इराण-इस्त्रायल संघर्ष आणि इस्त्रायल-अमेरिका तणाव यामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या इंधन तुटवड्याची झळ आता स्थानिक स्तरावर जाणवू लागली आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आल्याने उरणमधील अनेक हॉटेल्स, कॅन्टीन आणि धाब्यांमध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, काही व्यावसायिकांना दोन ते तीन हजार रुपये मोजून लहान सिलिंडर 'ब्लॅक' मध्ये खरेदी करण्याची वेळ आली आहे. तर काहींनी १५ ते २० हजार रुपयांची गुंतवणूक करून इंडक्शन कुकरचा पर्याय स्वीकारला आहे.

लाकडी चुलीचा पर्याय, पण अडचणी कायम

गॅसअभावी अनेकांनी पुन्हा लाकडी चुली पेटवल्या आहेत. मात्र, हा पर्यायही त्रासदायक ठरत आहे. लाकडाच्या मोळीचे दर दुप्पट होऊन ३०० रुपयांवर पोहोचले आहेत. चुलीवर स्वयंपाक करण्यास अधिक वेळ लागत असल्याने उत्पादन केवळ २० ते ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित झाले आहे. उष्णता आणि धुरामुळे काम करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.

उरणमध्ये हॉटेल व्यावसायिकांना लाकडी चुलीचा आधार; व्यावसायिक सिलिंडरवर निर्बंध, आंतरराष्ट्रीय तणावाचा फटका थेट सर्वसामान्यांच्या पोटाला
Mumbai : पुरेशा गॅसअभावी हॉटेल व्यवसायाच्या ‘चुली’ विझण्याच्या मार्गावर

मी गेली ५० वर्षे हॉटेल व्यवसायात आहे, पण अशी बिकट परिस्थिती कधीच पाहिली नाही. गॅसवर निर्बंध आल्याने नाइलाजास्तव चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. यात वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत. सरकारने आम्हाला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून गॅस पुरवठा सुरळीत करावा.

रंगनाथ चौलकर, ज्येष्ठ व्यावसायिक

उरणमध्ये हॉटेल व्यावसायिकांना लाकडी चुलीचा आधार; व्यावसायिक सिलिंडरवर निर्बंध, आंतरराष्ट्रीय तणावाचा फटका थेट सर्वसामान्यांच्या पोटाला
जिभेचे चोचले महाग होणार! हॉटेल्स गॅसवरून 'लाकडा'वर गेल्याचा परिणाम

व्यवसायावर मोठा परिणाम

सिलिंडरअभावी उरणमधील अनेक चहाच्या टपऱ्या आणि छोटे धाबे बंद ठेवावे लागले आहेत. जे सुरू आहेत, त्यांनाही वाढत्या इंधन खर्चामुळे पदार्थांचे दर वाढवण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. सातासमुद्रापार सुरू असलेल्या युद्धाची धग आता थेट उरणमधील कष्टकरी हॉटेल व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहावर परिणाम करत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

logo
marathi.freepressjournal.in