अंबानींच्या गणेशोत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी; आलिया-रणबीर, कियारा-सिद्धार्थसह स्टार कपल्सच्या फॅशनची चर्चा

आलिया भट्ट-रणबीर कपूर, कतरिना कैफ-विकी कौशल, करीना कपूर-सैफ अली खान, कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा, जिनिलीया देशमुख-रितेश देशमुख यांसह अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी पारंपरिक आणि स्टायलिश पेहरावात उपस्थिती लावली.
अंबानींच्या गणेशोत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी; आलिया-रणबीर, कियारा-सिद्धार्थसह स्टार कपल्सच्या फॅशनची चर्चा
अंबानींच्या गणेशोत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी; आलिया-रणबीर, कियारा-सिद्धार्थसह स्टार कपल्सच्या फॅशनची चर्चा(Photo - Ashwini Sawant)
Published on

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाच्या 'अँटिलिया' निवासस्थानी १४ सप्टेंबर रोजी 'अँटिलिया चा राजा' गणेश चतुर्थी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावली. आलिया भट्ट-रणबीर कपूर, कतरिना कैफ-विकी कौशल, करीना कपूर-सैफ अली खान, कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा, जिनिलीया देशमुख-रितेश देशमुख यांसह अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी पारंपरिक आणि स्टायलिश पेहरावात उपस्थिती लावली.

आलिया-रणबीरचा खास लूक

आलिया भट्टने प्रसिद्ध डिझायनर मसाबा गुप्ताने खास तयार केलेली मेटॅलिक आइस-ब्लू साडी नेसली होती. साडीवरील नाजूक विणकाम आणि असिमेट्रिक ऑफ-शोल्डर कॉर्सेट ब्लाउजमुळे तिचा लूक आकर्षक दिसत होता. पोल्की ड्रॉप इअररिंग्ज आणि बांगड्यांनी तिने पारंपरिक टच दिला होता.

रणबीर कपूरने नेव्ही-ब्लू रंगाचा गुडघ्यापर्यंत लांबीचा कुर्ता आणि त्यावर क्रीम रंगाच्या फ्लोरल थ्रेडवर्कने सजवलेले नेहरू जॅकेट परिधान केले होते.

कियारा-सिद्धार्थची उत्सवी झलक

कियारा अडवाणीने ब्लश-पिंक चंदेरी साडीत हजेरी लावली. एमराल्ड आणि डायमंड चोकर तसेच बांगड्यांनी तिचा लूक खुलवला.

तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्राने आयव्हरी रंगाचा शॉर्ट कुर्ता परिधान केला होता. विविधरंगी फ्लोरल थ्रेडवर्क आणि नाजूक एम्ब्रॉयडरी असलेल्या या कुर्त्यामुळे त्याचा लूक देखणा दिसत होता.

करीना-सैफचा शाही अंदाज

करीना कपूरने रुंद सोनेरी जरीच्या बॉर्डरने सजवलेला पिवळ्या रंगाचा फ्लोअर-लेंथ अनामिका खन्ना अनारकली परिधान केला होता. अनेक पदरी मोत्यांच्या नेकलेसने तिच्या लूकला क्लासिक टच दिला.

सैफ अली खानने गडद किरमिजी रंगाचा कुर्ता आणि पांढरे धोतर परिधान करत पारंपरिक अंदाज कायम ठेवला.

कतरिना-विकीचा साधा, पण आकर्षक लूक

कतरिना कैफ ऑलिव्ह-ग्रीन रंगाच्या फ्लेअर्ड अनारकलीमध्ये दिसली. भरजरी एम्ब्रॉयडरी केलेल्या दुपट्ट्यावर राजस्थानी मिरर वर्क, रंगीबेरंगी धाग्यांचे नक्षीकाम आणि नाजूक लटकन होते.

विकी कौशलने आयव्हरी आणि गोल्ड रंगाचा चिकनकारी कुर्ता सेट परिधान केला होता. कतरिनाच्या लूकला त्याच्या पारंपरिक पेहरावाने सुरेख साथ दिली.

जिनिलीया-रितेशचाही स्टायलिश अंदाज

जिनिलीया देशमुखने मिंट रंगाच्या फ्लेअर्ड लेहेंग्यात सर्वांचे लक्ष वेधले. शेवरॉन स्कर्टच्या काठावरील मेटॅलिक-गोल्ड एम्ब्रॉयडरी, निळा एम्ब्रॉयडरी ब्लाउज आणि गडद निळा दुपट्टा यामुळे तिचा लूक उठून दिसत होता. पारंपरिक कुंदन नेकपीसने तिचा साज पूर्ण केला.

रितेश देशमुखने गडद ट्युनिकवर चारकोल-ग्रे शॉर्ट बंदगला जॅकेट परिधान करत समकालीन एथनिक लूक निवडला.

इतर सेलिब्रिटींचेही हटके फॅशन लूक

या सोहळ्यात अनन्या पांडेने हळदी-पिवळ्या रंगाची बांधणी साडी नेसली होती. रुंद सोनेरी बॉर्डर आणि मोठ्या टर्कॉइज इअररिंग्जमुळे तिचा लूक आकर्षक दिसत होता.

जान्हवी कपूरने विविध रंगांच्या पटोला लेहेंग्यात भारतीय वस्त्रपरंपरेचा अंदाज दाखवला. बिंदी, लांब इअररिंग्ज, बांगड्या आणि मोठ्या अंगठ्यांनी तिने लूकला पारंपरिक झळाळी दिली.

रणवीर सिंहने पांढऱ्या रंगाचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. सोनेरी बटणांचे नेहरू जॅकेट, टेक्स्चर्ड कुर्ता आणि मॅचिंग ट्राउझर्ससोबत त्याने अंबर-टिंटेड एव्हिएटर्स आणि डायमंड स्टड्स घातले होते.

रेखाने फिकट जांभळ्या, तपकिरी आणि हिरव्या चौकड्यांची भरजरी साडी परिधान केली होती. अनेक पदरी नेकलेस, चोकर, लांब इअररिंग्ज आणि बिंदीमुळे तिचा लूक शाही दिसत होता.

खुशी कपूरने भरजरी लाल लेहेंग्यात तर काजोलने लाल-गुलाबी साडीत उत्सवी अंदाज दाखवला.

करिश्मा कपूरने गुलाबी आणि कोरल रंगांच्या साडीतील सहजसुंदर लूक केला, तर शनाया कपूरने गडद जांभळ्या रंगाची नाजूक सोनेरी एम्ब्रॉयडरी असलेली साडी नेसली.

क्रिती सेनॉनने रॉयल-ब्लू बांधणी साडीत ग्लॅमरस लूक केला. दिशा पटानीने भरजरी लाल लेहेंग्यात नाट्यमय अंदाज सादर केला. गौरी खाननेही एम्ब्रॉयडरी केलेल्या लाल कुर्ता सेटमध्ये आपली फॅशन स्टाइल दाखवली.

अँटिलियातील गणेशोत्सवात फॅशनचा जलवा

'अँटिलिया चा राजा'च्या गणेश चतुर्थी सोहळ्यात यंदा भक्ती आणि उत्साहासोबत बॉलिवूडच्या फॅशनचीही खास झलक पाहायला मिळाली.

पारंपरिक साड्या, भरजरी लेहेंगे, कुर्ता सेटपासून इंडो-वेस्टर्न पोशाखांपर्यंत विविध स्टाइल्सनी सेलिब्रिटींच्या आगमनाला विशेष रंग चढवला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in