आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. Photo - Devendra Fadnavis (FB)
यावर्षी या पूजेचा मान वारकरी दाम्पत्य कैलास उगले आणि कल्पना उगले यांना मिळाला. Photo - Devendra Fadnavis (FB)
पांडुरंगाच्या चरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या कल्याणासाठी व बळीराजाच्या समृद्धीसाठी साकडे घातले.Photo - Devendra Fadnavis (FB)
पहाटे ३ वाजता श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या कुटुंबासह आणि नाशिकमधील मानाचे वारकरी दाम्पत्य कैलास व कल्पना उगले यांच्या समवेत रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी गेले.Photo - Devendra Fadnavis (FB)
या शासकीय महापूजेत श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींना अभिषेक, पूजन आणि मंगल आरती करण्यात येते.
Photo - Devendra Fadnavis (FB)
या शासकीय पूजेदरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगीही श्रद्धेने सहभागी झाल्या.Photo - Devendra Fadnavis (FB)
शासकीय महापूजेनंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला.Photo - Devendra Fadnavis (FB)