रोज शहाळ्याचे पाणी प्या.. आणि राहा तंदुरुस्त; जाणून घ्या काय आहेत फायदे

रोज शहाळ्याचे पाणी प्या.. आणि राहा तंदुरुस्त;  जाणून घ्या काय आहेत फायदे
फोटो सौ : FPJ
Published on
कोवळा नारळ सर्वांनाच आवडतो. तो आरोग्यदायी घटकांनी भरलेला असतो. हे अनेकांना माहीत आहे. मोठे सेलिब्रिटीज, चित्रपट अभिनेते शहाळ्याचे पाणी पिताना बघायला मिळतात. ते मोठ्या हॉटेलमध्ये महागड्या पेयांपेक्षाही शहाळे पिणे पसंंत करतात. पाहुयात शहाळे पिण्याचे काय फायदे आहेत.
कोवळा नारळ सर्वांनाच आवडतो. तो आरोग्यदायी घटकांनी भरलेला असतो. हे अनेकांना माहीत आहे. मोठे सेलिब्रिटीज, चित्रपट अभिनेते शहाळ्याचे पाणी पिताना बघायला मिळतात. ते मोठ्या हॉटेलमध्ये महागड्या पेयांपेक्षाही शहाळे पिणे पसंंत करतात. पाहुयात शहाळे पिण्याचे काय फायदे आहेत.फोटो सौ : Free Pik
शहाळ्याचे पाणी नेहमीच ताजेतवाने असते. ते कधी शिळे होत नाही, ते थंड असल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास त्याचा उपयोग होतो.
शहाळ्याचे पाणी नेहमीच ताजेतवाने असते. ते कधी शिळे होत नाही, ते थंड असल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास त्याचा उपयोग होतो. फोटो सौ : FPJ
शहाळ्याच्या पाण्यात पोटॅशियम, सोडीयम आणि मॅग्नीशियम असते. हे महत्वपूर्ण इलेक्ट्रोलाईट्स शरीरातील द्रव संतुलन करण्यास मदत करतात. ज्यांना प्रचंड घाम येतो त्यांच्यासाठी शहाळे पिणे फायद्याचे असते.
शहाळ्याच्या पाण्यात पोटॅशियम, सोडीयम आणि मॅग्नीशियम असते. हे महत्वपूर्ण इलेक्ट्रोलाईट्स शरीरातील द्रव संतुलन करण्यास मदत करतात. ज्यांना प्रचंड घाम येतो त्यांच्यासाठी शहाळे पिणे फायद्याचे असते. फोटो सौ : FPJ
शहाळ्याच्या पाण्यात विटामिन सी आणि व्हिटॅमिन बी यासह जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.
शहाळ्याच्या पाण्यात विटामिन सी आणि व्हिटॅमिन बी यासह जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. फोटो सौ : Free Pik
शहाळ्यातील पाणी पिल्याने शरीरात पार्टिकल्स आणि क्रिस्टल्स तयार करण्यास प्रतिबंध होतो, त्यामुळे किडनी स्टोनचा धोका टळतो.
शहाळ्यातील पाणी पिल्याने शरीरात पार्टिकल्स आणि क्रिस्टल्स तयार करण्यास प्रतिबंध होतो, त्यामुळे किडनी स्टोनचा धोका टळतो.फोटो सौ : FPJ
शहाळ्याचे पाणी दिवसातून दोन वेळा प्यावे त्यामुळे पचनशक्ती तयार होण्यस मदत होते. कारण या पाण्यात तंतुमय घटक मोठ्या प्रमाणावर असतात.
शहाळ्याचे पाणी दिवसातून दोन वेळा प्यावे त्यामुळे पचनशक्ती तयार होण्यस मदत होते. कारण या पाण्यात तंतुमय घटक मोठ्या प्रमाणावर असतात. फोटो सौ : Free Pik
शहाळ्याचे पाणी पिल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. कारण ते उच्च कॅलरी पेयांच्या तुलनेत कमी कॅलरीज असलेला एक उत्तम पर्याय आहे.
शहाळ्याचे पाणी पिल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. कारण ते उच्च कॅलरी पेयांच्या तुलनेत कमी कॅलरीज असलेला एक उत्तम पर्याय आहे. फोटो सौ : Free Pik
काहीवेळा पोट खराब झाल्याने वारंवार शौचास जावे लागते आणि डीहायड्रेशन होते. अशा वेळी शहाळाचे पाणी पिल्याने  शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि डीहायड्रेशनमुळे आलेला अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.
काहीवेळा पोट खराब झाल्याने वारंवार शौचास जावे लागते आणि डीहायड्रेशन होते. अशा वेळी शहाळाचे पाणी पिल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि डीहायड्रेशनमुळे आलेला अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. फोटो सौ : FPJ
शहाळ्याच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. नियमितपणे पिल्याने तुमच्या शरीरात संसर्ग आणि रोगांशी लढण्याची क्षमता तयार होते. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते. )
शहाळ्याच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. नियमितपणे पिल्याने तुमच्या शरीरात संसर्ग आणि रोगांशी लढण्याची क्षमता तयार होते. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते. )फोटो सौ : FPJ
logo
marathi.freepressjournal.in