दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स

दसरा अवघ्या काही दिवसांवर आला असून, घराच्या मुख्य दरवाजाला सुंदर तोरण लावण्याची तयारी सुरू झाली आहे. यंदा झेंडूची फुलं, आंब्याची पानं, मोती, मणी आणि घंट्यांनी सजवलेली ७ आकर्षक तोरण डिझाईन्स पाहा...
दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स
दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स
Published on: 

दसरा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असलेला हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी पूजा-अर्चा केली जाते, आपट्याची पानं वाटली जातात आणि घराच्या मुख्य दरवाजाला झेंडूची फुलं व आंब्याच्या पानांचं तोरण लावलं जातं. दसऱ्याला तोरण लावणं शुभ आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. तुम्हालाही यंदा नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या आणि आकर्षक पद्धतीने घर सजवायचं असेल, तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत झेंडूची फुलं, आंब्याची पानं, मोती, मणी आणि घंट्यांनी सजवलेली ७ सुंदर तोरण डिझाईन्स. ही डिझाईन्स पाहून तुम्हालाही घर सजवण्यासाठी नक्कीच छान कल्पना सुचतील.

१) क्लासिक झेंडू + आंब्याची पाने तोरण

घट्ट झेंडूच्या माळा आणि मध्ये ताजी आंब्याची पाने वापरून तयार केलेलं हे पारंपरिक तोरण साधं, सुंदर आणि प्रत्येक दाराला शोभून दिसणारं आहे.

२) झेंडू + मोत्यांच्या माळांचं सुरेख तोरण

झेंडूच्या फुलांसोबत पांढऱ्या मोत्यांच्या लटकन माळा जोडल्यास तोरणाला royal आणि festive लूक मिळतो; घराच्या मुख्य दरवाजासाठी हा प्रकार खूप आकर्षक दिसतो.

३) झेंडू + घंटी + आंब्याची पानं तोरण

झेंडूच्या रांगांसोबत छोट्या पितळी घंट्या आणि आंब्याची पानं जोडल्यास तोरण अधिक पारंपरिक आणि शुभ वाटतं; वाऱ्याने येणारा हलका नादही वातावरण प्रसन्न करतो.

४) झेंडू + कुंदा/मोगरा मिक्स फुलांचे तोरण

केशरी झेंडू, पांढरा मोगरा किंवा कुंदा आणि हिरवी आंब्याची पानं यांचा मिलाफ केल्यास रंगसंगती खूप उठून दिसते आणि दाराला फ्रेश फेस्टिव्ह लुक मिळतो.

५) झेंडू + आरशाच्या लटकनांचं डेकोरेटिव तोरण

झेंडूच्या फुलांमध्ये छोटे आरसे, रंगीत मणी आणि कापडी लटकन जोडल्यास तोरणाला पारंपारिक आणि आधुनिकतेचा टच मिळतो; फोटोसाठीही हा प्रकार खूप सुंदर दिसतो.

६) झेंडू + कमळ/पानाच्या आकाराच्या फॅब्रिक डेकोरचं तोरण

खऱ्या फुलांसोबत कापडी कमळ, पानांच्या आकाराचे डेकोरेटिव्ह पीसेस किंवा एम्ब्रॉयडर्ड पॅचेस वापरल्यास तोरण जास्त दिवस टिकते आणि पुन्हा वापरण्याजोगे ठरते.

७) झेंडू + नारळाच्या शेंड्या + शुभ लटकन तोरण

सर्व छायाचित्रे 'एआय'ने बनविलेली आहेत

झेंडू, आंब्याची पाने, लहान शुभ-लटकन, मणी आणि नारळाच्या शेंड्यांचा वापर करून बनवलेलं तोरण पारंपरिकतेसोबतच थोडा रस्टिक आणि युनिक लूक देतं.

logo
marathi.freepressjournal.in