गणेशोत्सवासाठी जिनिलीयाचा मराठमोळा लूक; साडीपासून दागिन्यांपर्यंत सगळंच सुंदर, एकदा फोटो पाहाच

जिनिलीयाने महाराष्ट्रीयन संस्कृतीची झलक दाखवणारा आकर्षक पारंपरिक लूक केला होता. तिच्या या मराठमोळ्या अंदाजाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
गणेशोत्सवासाठी जिनिलीयाचा मराठमोळा लूक; साडीपासून दागिन्यांपर्यंत सगळंच सुंदर, एकदा फोटो पाहाच
(Photos - Instagram)
Published on

गणेशोत्सवामुळे सध्या सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले आहे. यानिमित्ताने जिनिलीयाने महाराष्ट्रीयन संस्कृतीची झलक दाखवणारा आकर्षक पारंपरिक लूक केला होता. तिच्या या मराठमोळ्या अंदाजाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

रंगीबेरंगी साडीने वेधलं लक्ष

गणेशोत्सवाच्या या खास दिवसासाठी जिनिलीयाने काठपदराची साडी नेसली होती. गडद लाल, उठावदार गुलाबी आणि चमकदार पिवळ्या रंगांचे रुंद पट्टे या साडीचे विशेष आकर्षण ठरले. पारंपरिक साडीवर रंगीबेरंगी चौकोनी आणि भौमितिक रचना पाहायला मिळत होती. गुलाबी आणि पिवळ्या रंगांच्या रुंद पट्ट्यांसोबत लाल आणि सोनेरी रंगाची नक्षीदार किनार साडीचे सौंदर्य अधिक खुलवत होती.

साडीच्या पदरामध्ये कमळाच्या नक्षीचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे उठावदार रंगसंगतीला पारंपरिकतेची नाजूक छटा मिळाली होती. या साडीमुळे जिनिलीयाच्या गणेशोत्सवातील लूकमध्ये उत्सवी आणि पारंपरिक अशा दोन्ही अंदाजांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळाले.

लाल ब्लाउजमुळे लूकला आधुनिक टच

जिनिलीयाने या साडीसोबत मॅचिंग लाल रंगाचा ब्लाउज परिधान केला होता. कोपरापर्यंतच्या बाह्या आणि गोल गळ्याची रचना असलेल्या या ब्लाउजचा पुढील भाग तुलनेने साधा ठेवण्यात आला होता. मात्र, मागील बाजूस ओपन-बॅक डिझाइन, छोट्या टाय-अप दोऱ्या आणि सोनेरी रंगाच्या नक्षीमुळे ब्लाउजला आधुनिक स्पर्श मिळाला.

सोनेरी दागिन्यांचा दिमाख

जिनिलीयाने दागिन्यांमध्येही पूर्णपणे पारंपरिक अंदाज जपला होता. तिच्या गळ्यात सोन्याच्या दागिन्यांच्या अनेक माळा पाहायला मिळाल्या. त्यात चोकरपासून सुरुवात होत असून, त्यानंतर आकर्षक आणि नक्षीदार पेंडंट असलेल्या लांब माळांचा समावेश होता.

यासोबत पारंपरिक झुमके, बुगडी आणि उठावदार अंगठ्या तिने परिधान केल्या होत्या. हिरव्या काचेच्या बांगड्यांसोबत सोन्याचे कडेही तिच्या हातात उठून दिसत होते. या दागिन्यांमुळे तिचा मराठमोळा साज अधिकच खुलला.

साधा, पण उठावदार मेकअप

जिनिलीयाने मेकअपमध्येही साधेपणा जपला होता. डोळ्यांना विंग्ड आयलाइनरने उठाव दिला होता, तर गालांवर हलका गुलाबी ब्लश आणि ओठांवर रोझ रंगाची लिपस्टिक लावली होती. कपाळावरील मोठी मरून रंगाची टिकली आणि पांढऱ्या कमळांनी सजवलेला सुबक अंबाडा तिच्या लूकला आणखी पारंपरिक बनवत होता.

कुटुंबाचाही पारंपरिक अंदाज

रितेश देशमुख आणि त्यांची दोन मुले यांनीही या उत्सवासाठी पारंपरिक पोशाखाची निवड केली होती. तिघांनीही बहुरंगी फुलांच्या नक्षीचे पोशाख परिधान केले होते. कुर्ता-पायजम्यासोबत नेहरू जॅकेट असा त्यांचा लूक होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा गणेशोत्सवातील पारंपरिक अंदाज विशेष आकर्षक दिसत होता.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in