

अभिनेत्री करिश्मा तन्नाने तिच्या साऊथ इंडियन स्टाईल 'डोहाळे जेवण' सोहळ्याची खास झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. पारंपरिक साऊथ इंडियन विधी, कुटुंबीयांचे आशीर्वाद आणि भावनिक क्षणांनी भरलेला हा खास समारंभ संस्कृतीशी घट्ट जोडल्याचे फोटोंमध्ये पाहायला मिळाले. या सोहळ्यात करिश्मा अत्यंत सुंदर आणि आनंदी दिसत होती.
करिश्माच्या 'डोहाळे जेवण' सोहळ्याची खास झलक
इन्स्टाग्रामवर साऊथ इंडियन स्टाईल समारंभातील खास क्षण शेअर करत करिश्माने हा अनुभव तिच्यासाठी आणि वरुणसाठी किती खास होता, याबद्दल भावना व्यक्त केल्या. तिने या अनुभवाला मॅजिकल म्हटले आहे. साऊथ इंडियन परंपरा, पारंपरिक पूजा, मंत्र आणि कौटुंबिक विधी जवळून अनुभवण्याची संधी मिळाल्याचेही तिने सांगितले.
हा दिवस भावनिक, पवित्र आणि अत्यंत अर्थपूर्ण असल्याचे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे. पारंपरिक विधी आणि जवळच्या लोकांच्या आशीर्वादांमुळे हा सोहळा संस्कृती, अध्यात्म आणि कौटुंबिक आपुलकीचा सुंदर मिलाफ ठरल्याचे पाहायला मिळाले.
गोल्डन साडीत खुलले सौंदर्य
या खास समारंभासाठी करिश्माने 'गुलाटी एडिशन्स'ची गोल्ड आणि क्रीम रंगाची पारंपरिक साडी परिधान केली होती. नाजूक एम्ब्रॉयडरी असलेल्या या साडीचा पारंपरिक पद्धतीने घेतलेला पदर तिच्या संपूर्ण लूकला रॉयल टच देत होता.
साडी साधी आणि एलिगंट असली तरी तिच्या ज्वेलरी स्टाईलिंगने संपूर्ण लूक अधिक उठून दिसत होता.
हातावर रंगलेली मेहंदी, चेहऱ्यावरील हास्य आणि युनिक ज्वेलरीने तिच्या सौंदर्यात भर पाडली.
पारंपरिक दागिन्यांनी वेधलं लक्ष
करिश्माने अनेक गोल्ड नेकलेस लेयर केले होते.त्यामध्ये एमराल्ड डिटेलिंग असलेला स्टेटमेंट हार आणि चोकर स्टाईल नेकपीस विशेष लक्षवेधी ठरले.
तिने यासोबत आकर्षक चांदबाली इअररिंग्स, बिंदी, जाड गोल्ड बांगड्या आणि स्टेटमेंट रिंग्स परिधान केल्या होत्या. या दागिन्यांमुळे तिच्या पारंपरिक लूकला अधिक ग्रेस मिळाली.
गजऱ्याने पूर्ण केला पारंपरिक लूक
करिश्माने मेकअप सॉफ्ट आणि ग्लोई ठेवला होता.
ग्लोईंग स्किन, हलका ब्लश्ड, सौम्य आय मेकअप आणि न्यूड-ब्राऊन लिप्समुळे तिचा प्रेग्नन्सी ग्लो अधिक खुलून दिसत होता. लूकला फायनल टच देताना तिने सुंदरशी टिकली लावली होती. तसेच, मिडल पार्टेड हाफ-अप हेअरस्टाईल केली होती आणि त्यामध्ये गजरा माळला होता.
हा संपूर्ण लूक पारंपरिक समारंभाच्या वातावरणाला अगदी साजेसा दिसत होता.