Kartiki Ekadashi 2026 : एकनाथ शिंदे कुटुंबीयांसह विठुरायाच्या चरणी नतमस्तक; पंढरपुरातील शासकीय महापूजेचे खास क्षण

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबासह पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी नांदेडच्या सुधाकर शिंदे आणि प्रणिता शिंदे या वारकरी दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला. पाहा सोहळ्यातील खास फोटो.
Kartiki Ekadashi 2026 : एकनाथ शिंदे कुटुंबीयांसह विठुरायाच्या चरणी नतमस्तक; पंढरपुरातील शासकीय महापूजेचे खास क्षण
Published on: 

पंढरपूर : 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल'च्या जयघोषाने पंढरनगरी भक्तिमय झाली आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त शनिवारी (२१ नोव्हेंबर) पहाटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून आणि नातवासह श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी दाम्पत्यालाही महापूजेचा मान मिळाला. शिंदे कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भक्तिमय सोहळ्यातील खास क्षण पाहूया फोटोंमधून...पहाटे २ वाजून २० मिनिटांनी एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता शिंदे यांच्यासह विठुरायाची पूजा केली. यावेळी मंदिरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं.

कार्तिकी एकादशीचा भक्तिमय सोहळा! पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली.

पहाटे २ वाजून २० मिनिटांनी एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता शिंदे यांच्यासह विठुरायाची पूजा केली. यावेळी मंदिरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं.

शासकीय महापूजेचा मान यंदा नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचेगाव येथील सुधाकर दशरथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी प्रणिता शिंदे यांना मिळाला.

सुधाकर शिंदे हे शेतकरी असून, त्यांच्या पत्नी प्रणिता यांच्यासह गेल्या ११ वर्षांपासून नियमित पंढरपूरची वारी करत आहेत. यंदा त्यांना थेट शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला.

विठ्ठलभक्तीची २५ वर्षांची परंपरा! सुधाकर आणि प्रणिता शिंदे हे गेल्या २५ वर्षांपासून माळकरी आहेत. शेती सांभाळत त्यांनी आपली वारकरी परंपरा जपली आहे.

फुलांच्या माळांनी सजलेल्या विठुरायाचं मनमोहक रूप भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी शिंदे कुटुंबीयांनी नतमस्तक होत दर्शन घेतलं.

महापूजेदरम्यान एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळाचं संकट दूर होऊ दे आणि बळीराजाच्या आयुष्यात सुखाचे दिवस येऊ दे, अशी पांडुरंगाकडे प्रार्थना केली.

यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे, सून आणि नातूही उपस्थित होते. संपूर्ण शिंदे कुटुंबाने विठुरायाचं दर्शन घेतलं. या भक्तिमय सोहळ्यातील काही खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले.

विठुरायाच्या चरणी प्रार्थना करताना एकनाथ शिंदे भावुक झाले. या भक्तिमय वातावरणात सहभागी झाल्याने मनाला वेगळंच समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मानाचे वारकरी म्हणून निवड झालेल्या सुधाकर आणि प्रणिता शिंदे दाम्पत्याचा मंदिर समितीच्या कार्यक्रमात श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आणि वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला.

या वारकरी दाम्पत्याला एसटी महामंडळाकडून एक वर्ष मोफत प्रवासाचा पासही देण्यात आला. अनेक वर्षांच्या विठ्ठलभक्तीला मिळालेला हा विशेष सन्मान ठरला.

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविक दाखल झाले आहेत. टाळ-मृदंगाचा गजर, भजन-कीर्तन आणि 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमली आहे.