Parth Pawar Engagement : कायनात दारासोबत पार्थ पवारांचा साखरपुडा; पाहा सोहळ्यातील खास Photos

पार्थ पवार आणि कायनात दारा यांच्या साखरपुड्याचे खास फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. पुण्यात पार पडलेल्या या सोहळ्यातील मान्यवरांची उपस्थिती आणि नवदाम्पत्याचा आकर्षक लूक पाहा.
Parth Pawar Engagement : कायनात दारासोबत पार्थ पवारांचा साखरपुडा; पाहा सोहळ्यातील खास Photos
Parth Pawar Engagement : कायनात दारासोबत पार्थ पवारांचा साखरपुडा; पाहा सोहळ्यातील खास Photos
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा बुधवारी (२९ जुलै) अत्यंत उत्साहात आणि कौटुंबिक वातावरणात पार पडला.

या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नवदाम्पत्याच्या पारंपरिक लूकची, आकर्षक सजावटीची आणि पवार कुटुंबाच्या उपस्थितीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

पुण्यातील द रिट्झ-कार्लटन हॉटेलमध्ये हा साखरपुडा मोजक्या नातेवाईक, आप्तेष्ट आणि निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला. सोहळ्यात पवार कुटुंबातील सदस्यांसह विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते या सोहळ्याला उपस्थित होते.

या खास प्रसंगी पार्थ पवार यांनी क्रीम रंगाची पारंपरिक शेरवानी परिधान केली होती. तर कायनात दारा यांनी पेस्टल निळ्या छटेतील नक्षीकाम केलेली आकर्षक साडी नेसत साधेपणा आणि एलिगन्सचा सुंदर मिलाफ सादर केला. डायमंड दागिने, नैसर्गिक मेकअप आणि डोक्यावर घेतलेल्या ओढणीमुळे त्यांचा लूक अधिक खुलून दिसत होता.

समारंभस्थळी फुलांची आकर्षक सजावट आणि श्री गणेशाची भव्य फुलांची मूर्ती लक्षवेधी ठरली. संपूर्ण कार्यक्रमात पारंपरिक विधींसह आनंदी आणि जिव्हाळ्याचं वातावरण पाहायला मिळालं.

कायनात दारा या मूळच्या चंदीगडच्या असून सध्या दिल्लीमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या नावाबाबत आणि मूळ गावाबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांदरम्यान काही चुकीची माहितीही प्रसारित झाल्याचं सांगण्यात आलं होतं.

सर्व छायाचित्र सोशल मीडियाी

दरम्यान, पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे मोठ्या थाटामाटात पार पडणार असल्याची माहिती यापूर्वीच समोर आली आहे. साखरपुड्यानंतर आता या शाही विवाहसोहळ्याची उत्सुकता अधिक वाढली आहे.

logo
marathi.freepressjournal.in