
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये झळकली होती.
आंतरराष्ट्रीय मंचावर मराठीचा झेंडा फडकावल्यानंतर आता ती कुटुंबासोबत मुंबईतील खास ठिकाणांना भेट देत सुट्टीचा आनंद घेत आहे.
भायखळ्यातील ऐतिहासिक ‘राणीची बाग’ पाहण्यासाठी प्राजक्ताने आपल्या कुटुंबासह खास भेट दिली.
पडद्यावर ग्लॅमरस दिसणारी प्राजक्ता खऱ्या आयुष्यात मात्र कुटुंबाशी घट्ट नातं जपताना दिसते.
“उन्हाळ्याच्या सुट्टीत पोरं मामाच्या गावी जातात, ही आत्तूच्या शहरी येतात...” असे भन्नाट कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले.
प्राणी, दुर्मिळ पक्षी आणि हिरवाईने नटलेली राणीची बाग ही मुंबईतील सर्वात जुनी आणि लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक मानली जाते. दररोज हजारो पर्यटक भेट देतात.
सोशल मीडियावर सक्रिय असलेली प्राजक्ता तिच्या कामासोबतच कुटुंबासोबत घालवलेले खास क्षणही चाहत्यांसोबत शेअर करत असते.
व्यस्त शूटिंग शेड्यूलमधून वेळ काढत कुटुंबासोबत घालवलेले हे निवांत क्षण सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.