'मेरे सांवरे...' निळ्या पैठणीत सजली सुखदा खांडकेकर; नवरात्रीच्या चौथ्या दिवशी खास फोटोशूट

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी अभिनेत्री सुखदा खांडकेकरने निळ्या पैठणी साडीत खास फोटोशूट केलं आहे. 'मेरे सांवरे...' असं कॅप्शन देत तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेले सुंदर फोटो पाहा.
'मेरे सांवरे...' निळ्या पैठणीत सजली सुखदा खांडकेकर; नवरात्रीच्या चौथ्या दिवशी खास फोटोशूट
Published on: 
मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणारी सुखदा खांडकेकर ही उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक प्रतिभावान नृत्यांगनाही आहे.

मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी सुखदा तिच्या पारंपरिक मराठमोळ्या पेहरावामुळे आणि फॅशन सेन्समुळेही लक्ष वेधून घेत असते.

शारदीय नवरात्रीच्या चौथ्या दिवशी निळ्या रंगाला विशेष महत्त्व असून, याच निमित्ताने सुखदाने निळ्या पैठणी साडीत खास फोटोशूट केलं आहे.

गडद निळ्या रंगाच्या पैठणीवरील सोनेरी काठ, सुंदर नक्षीकाम आणि भरजरी पदरामुळे सुखदाचा पारंपरिक लूक अधिकच उठून दिसत आहे.

केसांचा सुंदर अंबाडा, त्यात माळलेली लाल फुलं, हलका मेकअप आणि चेहऱ्यावरचं मोहक हास्य सुखदाच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.

या खास फोटोशूटमध्ये सुखदाने हातात लाल गुलाबाची फुलं घेत सुंदर पोझ दिली असून, निळ्या पैठणीसोबत लाल फुलांचा मिलाफ विशेष लक्ष वेधून घेत आहे.

पैठणीसोबत सुखदाने मोत्यांच्या आणि रंगीत खड्यांच्या नक्षीचे आकर्षक दागिने, नथ आणि बांगड्या परिधान करून आपला मराठमोळा साज पूर्ण केला आहे.

'मेरे सांवरे... For me, Blue = शामरंग!' असं कॅप्शन देत सुखदाने निळ्या रंगाची श्रीकृष्णाच्या श्यामरंगाशी सांगड घातली आहे.

logo
marathi.freepressjournal.in