'नागिन ३' फेम सुरभी ज्योतीचा ३८ व्या वाढदिवशी बेबी शॉवर; पेस्टल थीमने वेधलं लक्ष

"Celebrating me and the lil one growing inside me" असे कॅप्शन देत सुरभीने या सेलिब्रेशनची झलक चाहत्यांसोबत शेअर केली.
'नागिन ३' फेम सुरभी ज्योतीचा ३८ व्या वाढदिवशी बेबी शॉवर; पेस्टल थीमने वेधलं लक्ष
(सर्व छायाचित्रे : Instagram/@surbhijyoti)
Published on

टेलिव्हिजन अभिनेत्री सुरभी ज्योती सध्या आयुष्यातील खास टप्पा अनुभवत आहे. नुकताच सुरभीने आपला ३८ वा वाढदिवस साजरा केला असून याच खास दिवशी तिचा बेबी शॉवरही पार पडला.

पती सुमित सूरीसोबत पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या सुरभीने या आनंदसोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

"Celebrating me and the lil one growing inside me" असे कॅप्शन देत सुरभीने या सेलिब्रेशनची झलक चाहत्यांसोबत शेअर केली. यावर्षी फेब्रुवारीमध्ये सुरभी आणि सुमित यांनी पहिल्या बाळाची गोड बातमी चाहत्यांना दिली होती.

पेस्टल थीममध्ये पार पडला खास सोहळा

सुरभीच्या बेबी शॉवरसाठी खास पेस्टल थीम ठेवण्यात आली होती. हलक्या रंगांच्या फुलांनी सजवलेले डेकोरेशन आणि सुंदर सजावटीमुळे संपूर्ण वातावरणाला फेरीटेल गार्डन पार्टीचा फील मिळत होता.

आई होणाऱ्या सुरभीसाठी आणि तिच्या होणाऱ्या बाळासाठी खास 'इव्हिल आय' थीमवरील शुभेच्छाही सजावटीचा भाग होत्या. या खासगी सोहळ्यात कुटुंबीय व जवळचे मित्र सहभागी झाले होते.

या कार्यक्रमात सुरभीचा पती सुमित सूरी संपूर्ण वेळ तिच्यासोबत दिसला. अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि आशा नेगी यांनीदेखील या खास सोहळ्याला उपस्थिती लावली.

लव्हेंडर मॅटर्निटी गाऊनमध्ये सुरभीचा ग्लॅमरस अंदाज

या खास सेलिब्रेशनसाठी सुरभीने लव्हेंडर रंगाचा सुंदर मॅटर्निटी गाऊन परिधान केला होता. फ्लोईंग डिझाइनमुळे तिचा बेबी बंप खास उठून दिसत होता.

तिने या लूकसोबत पर्ल ड्रॉप इअररिंग्स आणि पर्ल-गोल्ड ब्रेसलेट्स घालून एलिगंट टच दिला. सुरभीचा मेकअपही साधा आणि ग्लोइंग होता.

न्यूड लिप्स, सॉफ्ट आय मेकअप आणि नैसर्गिक ग्लोमुळे तिचा प्रेग्नन्सी ग्लो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत होता.

फुलांनी सजवलेल्या हेअरस्टाईलने वाढवली शोभा

सुरभीने हाफ-अप हाफ-डाउन हेअरस्टाईल करत सॉफ्ट कर्ल्स ठेवले होते. केसांमध्ये लावलेल्या ताज्या फुलांमुळे तिचा संपूर्ण लूक अधिक आकर्षक आणि रोमँटिक दिसत होता.

तिच्या या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in