नव्या संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर देशभरातील 19 पक्षांचा बहिष्कार

या बहिष्कारात महाराष्ट्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील समावेश आहे.
नव्या संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर देशभरातील 19 पक्षांचा बहिष्कार

केंद्र सरकारकडून येत्या 28 मे रोजी नव्या संसदेचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यावर देशभरातील 19 विरोधीपक्षांनी बहिष्कार टाकला आहे. या कार्यक्रमातून राष्ट्रपतींना बेदखल करणे हा लोकशाहीचा अपमान आहे. असे म्हणत विरोधी पक्षांकडून एकत्रितपणे निषेधपत्र जारी करण्यात आले आहे. या बहिष्कारात महाराष्ट्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील समावेश आहे.

उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्या पक्षांचे मत

नवीन संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर देशभऱातील 19 पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. ज्या हुकुमशाही पद्धतीने नव्या संसदेची निर्मिती केली जात आहे त्याकडे दुर्लक्ष करुन नवीन संसदेच्या उउद्घाटनाला यायला आवडले असते. मात्र, ज्या पद्धतीने या कार्यक्रमातून राष्ट्रपतींना बेदखल केले जात आहे तो लोकशाहीचा अपमान आहे. घटनेनुसार लोकसभा आणि राज्यसभा अशी दोन्ही सभागृह आणि राष्ट्रपती यांची मिळून संसद बनते. राष्ट्रपतींच्या सहीने कायदा पास होत असतो. महिला आदिवासी राष्ट्रपती बनवण्याची सर्वसमावेशक प्रक्रिया ज्या लोकशाहीने घडवून आणली त्याचाही अनादर होत आहे, असे मत नवीन संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधी पक्षांनी व्यक्त केले आहे.

एकीकडे या उद्घाटनावर 19 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. दुसरीकडे सरकार मात्र या कार्यक्रमाची दोरदार तयारी करताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संदर्भातील माहिती दिली. या नवीन संदसते दक्षिणेतील चोल साम्राज्याचा राजदंड स्थापित केला जाणार आहे. नव्या संसदेत अध्यक्षांच्या खुर्चीजवळ हा राजदंड ठेवला जाणार आहे. सत्ता हस्तांतर करण्यासाठी हा राज दिला जात होता अशी प्रथा आहे. भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळी देखील पंडित जवाहरलाल नेहरू यांना दिला होता, अशी माहिती शाह यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in