श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये ५०० कोटींचा गैरव्यवहार? संजय राऊत यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

संजय राउत यांनी एक्स या समाजमाध्यमावर हे आरोप केले आहेत. त्याबाबतचे पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. चंदा दो धंदा लो असा खेळ सध्या महाराष्ट्रात सुरू असून त्याचे सूत्रधार मिंधे सरकारचे बाळराजे असल्याचे राउत यांनी एक्सवर लिहिले आहे. श्रीकांत शिंदे फाउंडेशनसाठी ज्यांनी कोट्यावधी रुपये दिले ते दानशूर कोण? ही माहिती नागरिकांना मिळणे गरजेचं आहे.
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये ५०० कोटींचा गैरव्यवहार? संजय राऊत यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

प्रतिनिधी/मुंबई

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या निधीत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आहेत. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी आणि या उपक्रमांवर आतापर्यंत खर्च करण्यात आलेल्या निधीचा स्रोत काय आहे, हे कळत नाही, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल करण्यात येत असून त्याचा कोणताही हिशेब देण्यात येत नाही. धर्मादाय आयुक्त हिशेब द्यायलाही तयार नाहीत, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राऊत यांनी केली असून त्यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रदेखील लिहिले आहे.

संजय राउत यांनी एक्स या समाजमाध्यमावर हे आरोप केले आहेत. त्याबाबतचे पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. चंदा दो धंदा लो असा खेळ सध्या महाराष्ट्रात सुरू असून त्याचे सूत्रधार मिंधे सरकारचे बाळराजे असल्याचे राउत यांनी एक्सवर लिहिले आहे. श्रीकांत शिंदे फाउंडेशनसाठी ज्यांनी कोट्यावधी रुपये दिले ते दानशूर कोण? ही माहिती नागरिकांना मिळणे गरजेचं आहे. या फाऊंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सार्वजनिक धर्मादाय न्यासाने सखोल चौकशी करावी अशी तक्रार प्रसिद्ध वकील नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे केली. पण या तक्रारीस एक महिना उलटून गेला तरी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडून तक्रारीची दखलही घेतली गेली नाही. आणि राजकीय दबाव असल्यामुळेच माहितीच्या अधिकारात ही सगळी माहिती दिली जात नसल्याचा आरापेही संजय राऊत यांनी पत्रात केला आहे. या फाऊंडेशनसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष उघडला आहे व त्या माध्यमातून बिल्डर, ठेकेदारांकडून रोखीत रकमा घेतल्या जातात. आतापर्यंत किमान ५०० कोटी रुपये या माध्यमातून जमा केले आहेत. या फाऊंडेशनतर्फे अनेक शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात व ते अत्यंत भव्य स्वरूपात होतात. ते कार्य कौतुकास्पद आहेच, पण या भव्य उपक्रमावर आतापर्यंत खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचे स्रोत काय? या कार्यासाठी ज्यांनी कोट्यवधी रुपये दिले ते दानशूर कोण? याची माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे असल्याचे राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

खा. श्रीकांत शिंदे यांनी देखील संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना म्हटले आहे, संजय राऊत यांच्या तोंडून शिव्याशापाशिवाय काही येत नाही. पण फाऊंडेशन जे चांगले काम करते ते त्यांनी लिहिले आहे. ज्या अर्थी त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले त्यानुसार पंतप्रधान मोदींवरचा त्यांचा विश्वास वाढला आहे. या आरोपांची किती दखल घ्यावी याचा प्रसार माध्यमांनीही आता विचार करावा. राउत हे पत्राचाळ,खिचडी घोटाळ्यातील आरोपी आहेत . त्यांची जेलवारी देखील झाली आहे. खिचडी घोटाळ्यातले जे पैसे घेतलेत त्यातून त्यांनी कोणा विद्यार्थी, रुग्णाला पाच पैशांची तरी मदत केली आहे का. आरटीआयच्या माध्यमातून कोणाकडून पैसे आले हे सर्व कळते. थोडी तरी अक्कल असती तर हे आधी केले असते. हातात काही राहिले नाही म्हणून हे बिनबुडाचे आरोप आहेत असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

श्रीकांत शिंदे यांनी आरोप फेटाळले

दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी हे संपूर्ण आरोप फेटाळले असून ते बिनबुडाचे आहेत. ज्यांनी कायम शिव्याशाप दिले, त्यांनी किमान फाऊंडेशन चांगले काम करते, हे तरी लिहिले आहे. तसेच पत्राचाळ आणि खिचडी घोटाळ्यात पैसे खाऊन जेलवारी केलेल्यांनी किमान आमच्यावर तरी आरोप करू नयेत,” असे श्रीकांत शिंदे यांनी राऊत यांना सुनावले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in