जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध दोन पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल

अहमदनगर जिल्ह्यांतील शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कार्यक्रमांत जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याविरुद्ध आक्षेपाहं वक्तव्य केले होते.
जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध
दोन पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल

मुंबई : प्रभू श्रीरामाविषयी आक्षेपार्ह आव्हाड यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आणि वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड है आता चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यांच्याविरुद्ध घाटकोपर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून, लवकरच जितेंद्र आव्हाड यांची पोलिसांकडून चौकशी करून जबाब नोंदविण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यांतील शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कार्यक्रमांत जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याविरुद्ध आक्षेपाहं वक्तव्य केले होते. राम बहुजनांचा आहे. शिकार करुन खाणारा राम, राम शाकाहारी नव्हता, तर मासांहारी होता, अशी समाजामध्ये धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्याने सर्वत्र गदारोळ झाला होता. धार्मिक भावना दुखावल्यामुळे अनेक राजकीय पक्षानी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मोर्चा काढून घोषणाबाजी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषद घेत,जे वाल्मिकी प्रक्षिप्त आहे, म्हणजे स्वीकारहार्य नाही, निषिद्ध आहे, अशा पुस्तकातून खोडसाळपणे जो मजकूर मोठ्या प्रमाणात हिंदूंनी धमांतर करावा, म्हणून मुस्लीम शासकांनी टाकला, मूळ रामायणाशी दुरान्वये संबंध नाही, अशा मजकुराच्या प्रती पत्रकारांना दिल्या. त्यात प्रभू राम, देव इंद्र मदिरापान करत होते. अशा प्रकारचे आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले होते. त्याचा निषेध म्हणून भाजपाचे आमदार राम कदन यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

अशाच प्रकारे अन्य एका गुन्ह्याची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यानी जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर शुक्रवारी रात्री हा गुन्हा दाखल झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in