"आता त्यांनी निवृत्त व्हायला हवं", जिवलग मित्रानेचं दिला शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसऱ्या अजित पवार गटाकडून शरद पवार यांना निवृत्त होण्याचा सल्ला देण्यातआला होता
"आता त्यांनी निवृत्त व्हायला हवं", जिवलग मित्रानेचं दिला शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देत राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. पवारांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार विरोध झाला होता. यावेळी पवारांना त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला होता. यानंतर काही दिवसांनी अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी बंड करत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादी पक्षावर आपला दावा सांगितला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले.

राष्ट्रवादी काँग्रेसऱ्या अजित पवार गटाकडून शरद पवार यांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला गेला. आता शरद पवार यांच्या जीवलग मित्रानेच त्यांना हा सल्ला दिला आहे. पवारांचे जीवलग मित्र सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे(Serum Institute Chairman) प्रमुख सायरस पूनावाला(Cyrus Poonawalla) यांनी शरद पवार(Sharad Pawar) यांना निवृत्तीचा सल्ला दिला आहे. पूनावाला यांची भारतभर लससम्राट अशी ओळख आहे. पुनावाला आणि पवार याची जुनी मैत्री आहे. पुनावाला यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला दिला आहे.

पुनावाला यांना पत्रकारांनी राज्यातील सद्यस्थितीवर प्रश्न विचारला असता त्यांनी पवारांचं कौतुक केलं, पण यावेळी त्यांनी पवारांना निवृत्तीचा सल्ला देखील दिला. ते म्हणाले की, शरद पवार यांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी घालवली. त्यांनी देशासाठी मोठं योगदान दिलं आहे. ते फार हुशार आहेत. त्यांना जनतेची आणखी सेवा करता आली असती. मात्र, आता त्यांचं आणि माझं वय झालं आहे. त्यामुळे आता आम्ही निवृत्ती घ्यायला हवी, असं पूनावाला यांनी म्हटलं आहे. आता पूनावाला यांनी व्यक्त केलेल्या मतावर शरद पवार काय म्हणतात ते बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in