Video : अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या, FB Live मध्ये गोळीबाराचा थरार कैद; बोरिवली, दहिसरमध्ये तणाव

घडलेल्या प्रकारामुळे दहिसर परिसरातील वातावरण तापले असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
Video : अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या, FB Live मध्ये गोळीबाराचा थरार कैद; बोरिवली, दहिसरमध्ये तणाव

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या केली. हल्लेखोर मॉरिस नोरोन्हा यानेही स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. अभिषेक घोसाळकर यांना पाच गोळ्या लागल्या. पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी याबाबत माहिती दिली आहे. गोळीबाराचा थरार फेसबुक लाईव्हमध्ये कैद झाला असून, आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

मॉरिस भाई याने अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह केले. त्यानंतर ५ गोळ्या झाडल्या. यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला, तर आरोपी मॉरिसने स्वत:वर देखील गोळ्या झाडत आत्महत्या केली. अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. घडलेल्या प्रकारामुळे दहिसर परिसरातील वातावरण तापले असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

मॉरिस हा दहिसर भागातील गुन्हेगार होता. त्याच्यावर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असून तो समाजसेवक म्हणून वावरत होता. मॉरिसला राजकीय अभिलाषा होती. त्याचा राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न होता. अभिषेक घोसाळकर यांच्याशी त्याची मैत्री होती. त्यांच्या माध्यमातून तो शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. गुरुवारी मॉरिस यांनी त्यांच्या कार्यालयात साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्या कार्यालयात बोलावले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद होऊन मॉरिस नोरोन्हाने अभिषेक यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या.

हल्लेखोर मॉरिसची आत्महत्या

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या मॉरिसने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्याआधी त्याने फेसबुक लाईव्हही केले होते. मॉरिस हा दहिसर-बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत होता. स्थानिक राजकीय वर्तुळात मॉरिसला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखला जात होता. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत होता. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसमध्ये वर्षापूर्वी टोकाचा वाद झाला होता. मात्र, त्यांची पुन्हा मैत्री झाली होती. मात्र, ही मैत्री आता जीवावर बेतली आहे. दोघांमध्ये पैशांवरून वाद होता, अशीही माहिती समोर आली आहे. मॉरिसच्या समोर आलेल्या फोटोनुसार तो निवडणुकीसाठी तयारी करत असल्याचे दिसून येते.

लैंगिक अत्याचाराची खोटी तक्रार जीवावर बेतल्याचा संशय

मॉरिसविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा एक गुन्हा दाखल होता, याच गुन्ह्यात तो जामिनावर होता. लैंगिक अत्याचाराची खोटी तक्रार केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते. अभिषेकच्या सांगण्यावरून मॉरिसवर एमएचबी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा एक गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. काही दिवस जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर त्याला कोर्टाने जामीन मंजूर केला होता. हा राग त्याच्या मनात होता. गुरुवारी सायंकाळी अभिषेक घोसाळकर हे मॉरिसच्या दहिसर येथील एमएचबी, आयसी कॉलनीतील कार्यालयात आला होते. यावेळी या दोघांनी आपसांतील वाद मिटवून पुन्हा एकत्र काम करण्याचा निर्धार केला होता. त्यानंतर ते दोघेही फेसबुक लाईव्हमध्ये आले होते.

मॉरिसच्या कार्यालयाची मोडतोड

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी हल्लेखोर मॉरिसच्या कार्यालयाची तोडफोड केली. घडलेल्या प्रकारामुळे दहिसर परिसरातील वातावरण तापले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे.

मॉरिस हा दहिसर भागातील गुन्हेगार होता, त्याच्यावर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असून तो समाजसेवक म्हणून वावरत होता. मॉरिसला राजकीय अभिलाषा होती. त्याचा राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. अभिषेक घोसाळकर यांच्याशी त्याची मैत्री होती. त्याच्या माध्यमातून तो शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. गुरुवारी मॉरिस याने त्याच्या कार्यालयात साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. अभिषेक घोसाळकर यांना त्याच्या कार्यालयात बोलावले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद होऊन मॉरिस केनीने अभिषेक यांच्यावर तीन राऊंड गोळीबार केल्याचे समजते.

राज्यात गुंडांचे सरकार -आदित्य ठाकरे

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अभिषेक घोसाळकर आताच माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेले. तेवढ्यात बातमी आली त्याच्यावर गोळीबार झाला. काय चाललंय या राज्यात? गुंडांचं सरकार बसलंय. एका आमदाराने गोळी घातली, ती पण पोलीस स्टेशनमध्ये. दोन्ही बाजूने गुंडागर्दी चालू आहे, हे सरकार उलथवून लावावं लागेल. मिंधेला बदनाम करायची गरज नाही, ते बदनामच आहे, पण त्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in