Exit Polls: मोदी सरकार पुन्हा येणार! एक्झिट पोलचा अंदाज

Lok Sabha Election Exit Poll Results 2024: गेले दोन महिने देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर देशात पुन्हा कोणाची सत्ता येणार याचे भाकीत वर्तवणारे विविध संस्थाचे 'एक्झिट पोल्स' जाहीर करण्यात आले.
Exit Polls: मोदी सरकार पुन्हा येणार! एक्झिट पोलचा अंदाज

नवी दिल्ली: गेले दोन महिने देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर देशात पुन्हा कोणाची सत्ता येणार याचे भाकीत वर्तवणारे विविध संस्थाचे 'एक्झिट पोल्स' जाहीर करण्यात आले. भाजपप्रणीत रालोआ सरकार तिसऱ्यांदा स्थापन होऊ शकते, असा अंदाज ५ एक्झिट पोल्सनी जाहीर केला आहे. हा अंदाज खरा ठरल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ शकण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सात टप्प्यात मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत रालोआ सरकार पुन्हा स्थापन होत असल्याचे भाकीत आहे.

रालोआ आघाडीला ५४३ जागांपैकी ३५० जागा मिळतील, असा अंदाज पाच एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. सरकार बनवण्यासाठी किमान २७२ जागांची आवश्यकता असते. हे बहुमत रालोआ सहजपणे मिळवत असल्याचे दिसून येत आहे, तर विरोधी आघाडी 'इंडिया'ला केवळ १२० जागा मिळण्याचा अंदाज आहे. देशात लोकसभा व आंध्र प्रदेश, ओदिशा, अरुणाचल प्रदेश व सिक्कीम या विधानसभांसाठी १९ एप्रिल ते १ जून दरम्यान मतदान झाले. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत रालोआ आघाडी व विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीत घनघोर लढाई झाली.

दक्षिणेत भाजपचा चंचुप्रवेश

कर्नाटकात काँग्रेस सरकार असले तरीही अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, कर्नाटकात भाजपला २० ते २२ जागा, जेडीएसला ३ जागा, तर काँग्रेसला ३ ते ५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तामिळनाडूत इंडिया आघाडीला ३३ ते ३७ जागा आणि एसडीएला २ ते ४ जागा मिळण्याचा अंदाज आहे, 'एबीपी न्यूज-सी व्होटर'च्या एक्झिट पोलनुसार, आंध्र प्रदेशात रालोआला २१ ते २५ जागा आणि अन्य पक्षांना० ते ४ जागा मिळू शकतात. तेलंगणात एनडीला ७ ते ९ जागा, इंडिया आघाडीला ७ ते ९ जागा आणि इतरांना ० ते १ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तामिळनाडूत इंडिया आघाडीला ३७ ते ३९ जागा आणि एनडीएला ० ते २ जागांचा अंदाज आहे. केरळात रालोआला १ ते ३ आणि इंडिया आघाडीला १७ ते १९ जागा मिळू शकतात.

दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये भाजप सर्व जागांवर जिंकणार

बहुतांशी सर्व एक्झिट पोलनी दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये भाजप सर्वच्या सर्व जागांवर जिंकणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशात २९ पैकी २९, गुजरातमध्ये २६ पैकी २६, छत्तीसगडमध्ये ११ पैकी ११, दिल्लीतील ७ पैकी सात जागा भाजप जिंकेल, असा अंदाज आहे.

बिहारमध्ये 'एनडीए'ला ३२ ते ३७ जागा

बिहारमध्ये रालोआ व राजदप्रणीत महाआघाडीत जोरदार टक्कर होणार आहे. 'जन की बात' या एक्झिट पोलनुसार, बिहारमध्ये एनडीएला ३२ ते ३७, तर इंडिया आघाडीला ७-३ जागा मिळू शकतील, असा अंदाज आहे. भाजपला १४ ते १७, जदयूला १२ ते १४, लोजपला ४ ते ५, एचएएमला १, राजद ६-२, काँग्रेसला २-१ जागा मिळेल.

उत्तर प्रदेशात भाजपला ६२, 'इंडिया' १८ जागा

देशातील सर्वाधिक लोकसभेच्या जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशात रालोआला ८० पैकी ६२, तर सपा-काँग्रेसला १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. अमेठीतून स्मृती इराणी यांचा पराभव, तर रायबरेलीतून राहुल गांधी हे विजयी होण्याचा अंदाज आहे.

'टाइम्स नाऊ'च्या पोलनुसार महाराष्ट्रात भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाला मिळून (महायुती) २६ जागांवर विजय मिळेल, तर काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मिळून (महाविकास आघाडी) २२ जागांवर विजय मिळेल.

बारामतीत सुप्रिया सुळे विजयी होणार?

'टीव्ही ९- पोलस्ट्रैट 'व्या एक्झिट पोलनुसार, बारामतीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुधिया सुळे यांचा विजय होईल, तर राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव होईल. बारामतीसह शिरूर, रायगड आणि उस्मानाबाद (धाराशिव) या चारही मतदारसंघांम्कये कष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाची चव चाखावी लागणार आहे. एक्झिट पोलने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ६ जागांचा अंदाज वर्तवला असून अजित पवारांना एकही जागा जिंकता येणार नाही. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील हे पिछाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके है आघाडीवर आहेत. नागपूरला भाजपचे नितीन गडकरी आघाडीवर, काँग्रेसचे विकास ठाकरे पिछाडीवर, बीड- भाजपच्या पंकजा आघाडीवर, शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे पिछाडीवर आहेत, चंद्रपूर- भाजपचे उमेद्वार सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आधाडीवर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आधाडीवर, भाजपचे उज्ज्वल निकम पिछाडीवर आहेत. सांगली - ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील पिछाडीवर अपक्ष उमेकार विशाल पाटील आघाडीवर आहेत.

एक्झिट पोल

महाराष्ट्रात महाआघाडीचा महायुतीला मोठा धक्का

लोकसभेची निवडणूक असली तरीही महाराष्ट्रातील जनता काय कौल देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे, महायुतीने ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याची घोषणा केली असली तरीही प्रत्यक्षात 'एबीपी न्यूज-सी वेटर 'च्या सर्व्हेनुसार, महाराष्ट्रात 'महाआघाडी 'ला २३ ते २५, तर 'महायुती 'ला २२ ते २६ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गटाला ९, शरद पवार गटाला ६ आणि काँग्रेसला ८ अशा महाविकास आघाडीला एकूण २३ जागांवर विजय मिळू शकतो, तर महायुती २४ जागा जिंकू शकते. त्यात भाजपला राज्यात सर्वाधिक १७ जागा, शिंदे गटाला सहा, तर अजित पवार गटाला केवळ एक जागा मिळू शकते, असा अंदाज आहे.

हे सरकारी एक्झिट पोल काँग्रेसची टीका

लेोकसभा निवडणुकीचे शनिवारी जाहीर झालेले एक्झिट पोल' सरकारी एक्झिट पोल' आहेत. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा' एक्झिट पोल' आहे. जनतेच्या 'एक्झिट पौल' नुसार, इंडिया आघाडीला २९५ जागा मिळत आहेत. त्यातील एकही जागा कमी होणार नाही, असे काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या.

४ जूनला सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी

नवी दिल्ली : लेकसभा निवडणूक व राज्य विधानसभेची मतमोजणी ४ जूनला सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले. सिक्कीम व अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी सकाळी ६ वाजल्यापासून होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in