अजित पवारांवर आरोप, रोहित पवारांना मात्र वेगळाच संशय ; म्हणाले, "भाजपकडून..."

आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती.
अजित पवारांवर आरोप, रोहित पवारांना मात्र वेगळाच संशय ; म्हणाले, "भाजपकडून..."

निवृत्त आयपीएस अधिकारी आणि पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांमागे भाजपचा हात असावा, भाजप नेहमी ताकदवान नेत्यांना कमकुवत करण्याचं राजकारण करते असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी अजित पवार यांची पाठराखन केल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, भाजपने सातत्याने ताकदवान नेत्याना कमकुवत करण्याचं राजकारण केलं आहे. लोकांमध्ये अजित दादांची इमेज आहे. त्याला धक्का लावण्याचं काम केलं जात आहे. अचानक हा मुद्दा पुढे येणं, त्यावर लोकांमध्ये चर्चा होणं आणि अजित दादांना उत्तर द्यावं लागणं हा त्याचाचं भाग आहे का तपासावं लागेल. भाजपकडून अजित पवारांची ताकद कमी केली जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकातून काही भाष्य केलं होतं. त्यामध्ये अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री असताना आपल्याला येरवडा जेलच्या परिसरातील जागा ही खासगी बिल्डरला द्यावी असं सांगित्याचा आरोप केला होता. यावर गेल्या चार दिवसांपासून राज्यातील राजकारण मात्र चांगलचं तापलं आहे.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. आज बोलताना त्यांनी यामागे भाजपचा हात असण्याची शक्यता वर्तवली असल्याने रोहित पवारांनी अजित पवार यांची पाठराखन केली असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

अजित पवार यांनी दिलं स्पष्टीकरण

आपल्यावर केलेल्या कथिक आरोपांबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "अनेक वर्ष मी पुण्याचा पालकमंत्री होतो. पालकमंत्री या नात्यानं जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या काही आढावा बैठका घ्यायच्या असतात. एका रिटायर्ड आयपीएस अधिकाऱ्यांनी एक पुस्तक लिहिलं त्यानुसार मीडियात बातम्या आल्या की, अजित पवार अडचणीत त्यांच्यावर कारवाई करा. पण मी यात काहीही केलेलं नाही", असं अजित पवार यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in