अजित पवारांसोबतच्या हातमिळवणीवरुन आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचलं, म्हणाले, "तुमच्या गद्दारीमागे फक्त..."

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत काही मुद्यांना हात घातला आहे
अजित पवारांसोबतच्या हातमिळवणीवरुन आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचलं, म्हणाले, "तुमच्या गद्दारीमागे फक्त..."

आज (2 जुलै) अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 25-30 आमदांना घेत भाजपशी हातमिळवणी केली आहे. आज राजभवनात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख 8 नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेते राज्यासह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली. या घटनेवर ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत काही मुद्यांना हात घातला आहे.

त्यांनी त्यांच्या या पोस्ट मध्ये काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिन सरकारला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्न पडत होती, त्यांना एक वर्ष उलटल्यावर काय मिळालं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो,..जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपद मिळाल्यावर यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी?? असं म्हणत त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

या ट्विटमध्ये आदित्य पुढे म्हणाले आहेत की, "एक गद्दार आज टीव्हीवर म्हणाले, 145 जागा जिंकायच्या असतील तर यांना सोबत घ्या', असं वरिष्ठांनी सांगितलं." यावर त्यांनी मिंधेंकडे क्षमताच नाही हे सिद्ध झालं, नाहीतर एवढ्या गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला? अशी टीका त्यांनी ट्विटमधून केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी सर्वात शेवटी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. "आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं. मग आज भाजपने काय केलं? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना! एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे. 'स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी' अशी ही लढाई असणार आहे." अलं आदित्य ठाकरे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in