ठाकरे गटाकडून मुंबई पालिकेत सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात १ जूलै रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चावर विरोधकांनी आतापासून टीका करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शिंगे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. मुंबई महापालिकेत गेली २५ वर्ष ठाकेरेंनीच भ्रष्टाचार केला. तरीही आम्ही भ्रष्टाचार विरोधात आहोत हे म्हणायचं धाडस कसं होतं? मुंबईची अवस्था अशी का झाली? हे आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनाचं विचारलं पाहिजे. आपला उद्याचा मुक्काम हा जेलमध्ये असणार हे आदित्य ठाकरे यांना माहिती आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. आदित्य असो वा कुणीही असो, अशी टीका शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलं आहे.
शिंदे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याने संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. आमच्या डेड बॉड्या येतील असं धमकावलं गेलं. पण दिवसरात्र काम करुन आम्ही हे सरकार चालवलं. तीन महिन्यात सरकार जाईल असं वाटणारे लोक अजूनही बोंबा मारतील. पण हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. असा टोला संजय शिरसाट म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी आपला पक्ष कधीही फोडू शकते याची प्रचिती आम्हाला आली होती. २०१४ ला देखील असा प्रयोग झाला होता. शरद पवारांनी मारलेल्या सिक्सरमुळे शिवसेनेच्या चिंध्या झाल्या असल्याचं शिरसाट म्हणाले. मंत्रिमंडळाच्या विस्तावर बोलताना ते म्हणाले की, पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल. दिल्लीला जाणं हा प्रक्रियेचा भाग आहे. मंत्रिमंडळात कोणाला घेणं आणि कोणाला काढण हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यावर तेच बोलतील, असं म्हणत आम्हाला केंद्रात फेरबदलाचे संकते आम्हालाही मिळाले असून आमचेही मंत्री केंद्रात असतील, असं शिरसाट म्हणाले आहेत.