संजय शिरसाट यांच्या 'त्या' विधानावर आदित्य ठाकरे म्हणाले, "अशा सडक्या..."

राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ठाण्यातील मेळाव्यात गद्दारांना क्षमा नाही, असं म्हटलं होतं. यानंतर...
संजय शिरसाट यांच्या 'त्या' विधानावर आदित्य ठाकरे म्हणाले, "अशा सडक्या..."

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिससाट यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. याता त्यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याबद्दल केलेल्या विधानावरुन पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रियंता चुर्वेदी या काँग्रेसच्या नेत्या होत्या. पण त्या शिवसेनेत आल्यावर त्यांची सुंदरता पाहून आदित्य ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. आता आदित्य ठाकरे यांनी शिरसाट यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अशा सडक्या विचारांचे लोक राजकारणात टिकले कसे? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ठाण्यातील मेळाव्यात गद्दारांना क्षमा नाही, असं म्हटलं होतं.यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी "प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. तिथून त्या शिवसेनेत आल्यावर चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं की, 'प्रियंका चतुर्वेदी यांची सुंदरता पाहून पाहुन आदित्ये ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली', त्या प्रियंका चतुर्वेदी आता दुसऱ्यांना गद्दार म्हणतात", असं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं.

शिरसाट यांनी केलेल्या विधानावरुन प्रसारमाध्यमांनी आदित्य ठाकरे यांना विचारणा केली असता, गद्दारांना त्यांची किंमत कळली आहे. अशा सडक्या विचारांचे लोक साजकारणात टिकले कसे? असा प्रश्न पडतो. याचं दु:ख देखील होतं. जनता त्यांना त्यांची जागा दाखवले. असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पांना विरोध करुन भांडवल केलं,असं संजय शिरसाट म्हणाले असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी म्हटलं की, ज्यांना जेवढी किंमत आहे, तेवढीच देऊया. जास्त बोलून त्यांना मोठं करणे योग्य नाही. त्यांच्या गटात त्यांना जिथे ठेवायचे आहे,तिथे ठेवले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in