'या' प्रकरणांवरुन आदित्य ठाकरेंनी सरकारला घेरलं ; म्हणाले, "सुनावणी दरम्यान...."

गेल्या दोन तीन दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडी महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी फार महत्वाच्या असल्याचं मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
'या' प्रकरणांवरुन आदित्य ठाकरेंनी सरकारला घेरलं ; म्हणाले, "सुनावणी दरम्यान...."

गेल्या दोन तीन दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडी महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी फार महत्वाच्या असल्याचं मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तसंच महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर देखील त्यांनी भाष्य केलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा सुनावणीदरम्यान टाईम पास सुरु आहे. त्यांनी लवकर निर्णय घ्यावा असं देखील आदित्य म्हणाले. यावेळी मेट्रो कारशेड आणि रस्ते कॉन्ट्रॅक्टच्या मुद्यावरुन आदित्य यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

ते म्हणाले की, आम्ही पहिल्या दिवसापासून बोलत आलो ते सत्य होतं आणि सत्याचा विजय झाला. कांजूरमार्गला मेट्रो ६ च्या कारशेडचं काम या वर्षीपासून सुरु होत आहे. आम्ही कांजुरमार्गला मेट्रो ६ चा कार डेपो करणार होतो. मेट्रो ६, ३ आणि ४ चा इंटिग्रेटेड कार डेपो करणार होतो. मात्र, खोके सरकारनं मेट्रो ३ चा कारडेपो आरेमध्ये नेल्या. आमचा यात कुठलाही ईगो नव्हता. आरेचं जंगल वाचावं हाच आमचा हेतू होता. असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी रस्त्याच्या काँट्रॅक्टच्या विषयावर देखील भाष्य केलं. जानेवारीत भूमिपूजन केलं. त्याचं पुढे काय झालं? रोडची काम कधी करता. १ ऑक्टोबर ते ३० जून यात काम केलं जातं. आज बातम्या बघा, अजूनही एकाही रस्त्याची कामं सुरु केली नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. मुंख्यमंत्र्यांच्या मर्जीतली ही कामं असून हा घोटाळा आहे. मुख्यमंत्र्यांना काम करता येत नाही.अधिकाऱ्यांनी सांगितलचं की काँट्रक्टरला पावसाळ्यात नोटीस देणार होते. पण कोणाच्यातरी नातेवाईकांमुळे दिली नव्हती. असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in