मुख्यमंत्र्यांच्या विधानावर आदित्य ठाकरे संतापले ; म्हणाले, "हे विधान निर्लज्जपणाचं..."

भ्रष्टाचाराचा कोणता चेहरा असेल, तर हे खोके सरकार आहे,असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे
File Photo
File Photo
Published on

शनिवारी (24 जून) रोजी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे मुंबईच्या अनेक भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. पहिल्या पावसात मुंबई तुंबल्याने पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी 'पाऊस झाल्याचं स्वागत करा, पाणी साचलं याची तक्रार काय करता,' अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानावरुन माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं विधान हे निर्लज्जपणाचं, नाकर्तेपणाचं आहे. भ्रष्टाचाराचा कोणता चेहरा असेल, तर हे खोके सरकार आहे. असं आदित्या ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच माजी महापौर आणि सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात कामं केली आहेत. पण मुंबईकरांना कोणीही असं उत्तर दिलं नसल्याचं त्यांनी सांगितलं.

याचा अर्थ मुख्यमंत्र्याच्या वाहनांसाठी जेव्हा महामार्गावरील गाड्या थांबवल्या जातील. तेव्हा मुख्यमंत्री बोलतील, तुम्ही गर्दीत अडकलाय, तक्रार काय करता. माझं स्वागत करा. एवढा निर्लज्जपणा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार मी मुंबई कधीच पाहिला नसल्याचं ते यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, गेली वर्षभर मुबंईसह महाराष्ट्रात खोके सरकार आहे. मुंबई महापालिकेवर सरकारची हुकूमशाही चालू आहे. वेगवेगगळ्या कंत्राटात मोठे घोटाळे करण्यात आले. रस्त्यांचे घोटाळे मी समोर आणले असून जे घोटाळे झाले, त्याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. नंतर चौकशी होऊन ज्यांना अटक करायची ती आमचं सरकार आल्यावर करु, असा इशाराच आदित्या ठाकरे यांनी दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in