आदित्य ठाकरे बांधणार कोकणात पक्षाची मोठ! दोन दिवसांच्या दौऱ्यात साधणार तळागळातील कार्यकर्त्यांसोबत संवाद

२३ आणि २४ नोव्हेंबर रोजी आदित्य हे सिंधुदुर्गमधील दोडामार्ग ते रायगड जिल्ह्यातील नागोठाणे या दरम्यान दौरा करणार आहेत.
आदित्य ठाकरे बांधणार कोकणात पक्षाची मोठ! दोन दिवसांच्या दौऱ्यात साधणार तळागळातील कार्यकर्त्यांसोबत संवाद
Published on

ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे ठाकरे उद्यापासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर जाणार आहे. २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी आदित्य हे सिंधुदुर्गमधील दोडामार्ग ते रायगड जिल्ह्यातील नागोठाणे या दरम्यान दौरा करणार आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांसोबत खळा बैठकीतमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी संवाद साधणार आहे. कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत हा दौरा असला तरी या दौऱ्यात येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची पेरणी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या दौऱ्यात यादित्य हे कोणतीही सभा न घेता केवळ तळागळातल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. गेली दोन दिवस आदित्य हे फक्त बैठका घेणार असल्याने त्यांच्या दौऱ्याला आणि खळा बैठकीला महत्व प्राप्त होणार आहे. दरम्यान, आदित्य हे या दौऱ्यात अंगणात बसून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

खळा बैठक म्हणजे नेमकं काय?

कोकणात घरासमोर असलेल्या अंगणाला खळा म्हणतात. गावातील, घरातील किंवा वाडीतील कोणताही निर्णय असला तरी तो अंगणामध्ये(खळ्यात) बसून एकमुखी घेतला जातो. यात प्रत्येकाचं मत विचारात घेऊन निर्णय घेतला जातो. याच पद्धतीने आदित्य ठाकरे हे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यात खळा बैठका घेणार आहेत.

या दोन दिवसीय दौऱ्यात आदित्य ठाकरे हे विरोधातील आमदारांच्या मतदार संघात देखील खळा बैठका घेणार आहेत. यात मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदार संघातील दोडामार्ग येथे, आमदार नितेश राणे यांच्या कणवलीत, मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी, शेखर निकम यांच्या चिपळूण, योगेश कदम यांच्या खेड आणि आमदार भरत गोगावले यांच्या महाड मतदार संघात आदित्य कळा बैठका घेणार आहेत.

याच बरोबर आदित्य हे आपल्या सोबत असलेल्या आमदारांच्या मतदार संघात देखील बैठका घेणार आहेत. यात आमदार वैभव नाईक यांच्या कुडाळ मतदारसंघाचा, राजन सालवी यांच्या राजापूर मतदार संघाचा आणि आमदार भास्कर जाधव यांच्या गुहागर विधानसभा मतदार संघात खळा बैठक होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in