अजित पवार यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांचा देखील वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस एकाच दिवशी (२२ जुलै) येतो
अजित पवार यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांचा देखील वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री काळाने घाला घातला अन सर्वकाही उद्ध्वस्त झालं. या दुर्घडनेत १६ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर काहींना गंभीर दुखापत झाली. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणीही होर्डिंग, बॅनर लावू नये. तसंच जाहीराती देखील देऊ नये. असं आवाहन त्यांनी केलं आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपल्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना आपला वाढदिवस न साजरा करण्यात आवाहन केलं. परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेता या दोन्ही नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असतो.

आपल्या वाढदिवशी गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम न करता त्यासाठी होणारा खर्च इर्शाळवाडीच्या पुर्वसनासाठी वापरण्याता यावा असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस हा भाजपकडून सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भाजपचे कार्यकर्ते सेवा देणार असल्याची माहिती भाजपचे महाराष्ट्र् प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यावेळी इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणीही वाढदिवस साजरा करु नये, तसंच मोठे होर्डिंग लावू नयेत, याबाबतचे आदेश भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in