तब्बल चार महिन्यांनी राहुल गांधींची संसदेत ग्रँड एंट्री ; इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून जल्लोषात स्वागत

२४ मार्ज रोजी लोकसभा सचिवालयाकडून राहुल यांची खासदारकी काढून घेण्यात आली होती
तब्बल चार महिन्यांनी राहुल गांधींची संसदेत ग्रँड एंट्री ; इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून जल्लोषात स्वागत

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांना लोकसभा सचिवाललयाकडून पुन्हा सदस्यत्व बहाल करण्यात आलं आहे. यानंतर राहुल गांधी यांना तब्बल १३६ दिवसांनंतर ते आज संसदेत दाखल झाले आहेत. मोदी आडनाव मानहानी प्रकरणातात गुजरात न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. यानंतर २४ मार्ज रोजी लोकसभा सचिवालयाकडून राहुल यांची खासदारकी काढून घेण्यात आली होती.

आता ४ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना ठोठावलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर तीन दिवसात त्यांना त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आलं आहे. यानंतर आज त्यांनी तब्बल १३६ दिवसांनंतर संसदेत आलं. यावनेळी काँग्रेससह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी त्यांचं अगदी जल्लोषात स्वागत केलं.

राहुल गांधी संसंदेत एंट्री केल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये एक उत्साह पाहायला मिळाला. यावेळी फक्त काँग्रेस पक्षाचेचं नाही तर विरोधी पक्षातील नेते देखील उपस्थित होते. यावेळी विरोदी पक्षातील(इंडिया आघाडी) नेत्यांकडून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यानंतर राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर त्यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांची खासदारकी काढून घेतल्याने राहुल गांधी जवळपास चार महिने संसदेच्या बाहेर होते. त्यामुळे आज राहुल यांची संसदेत ग्रँड एंट्री झाल्याने विरोधी पक्षाच्या खासदाराकडून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

logo
marathi.freepressjournal.in