शरद पवारांच्या भेटीनंतर नाना पटोलेंचं विरोधी पक्षनेते पदाबाबत मोठं वक्तव्य ; म्हणाले...

आज महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली
शरद पवारांच्या भेटीनंतर नाना पटोलेंचं विरोधी पक्षनेते पदाबाबत मोठं वक्तव्य ; म्हणाले...

अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले आहे. शरद पवार यांच्याकडे काँग्रेसपेक्षा कमी संख्याबळ असल्याने आता विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने आपला दावा सांगितला आहे. मात्र, अजुनही विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही. दरम्यान, आज महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीत राज्याच्या विरोधी पक्षनेते पदावर चर्चा होईल.असं बोललं जात होतं. या भेटीनंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना शरद पवार यांच्याशी विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चा झाली का? राज्याच्या विरोधी पक्षनेता कोण होणार, असे प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारले.

यावर नाना पटोले यांनी विधानसभेचा विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचाच होईल आणि त्याच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब केलं जाईल, असं सांगितलं. नाना पटोले म्हणाले की, विधिमंडळाची एक व्यवस्था असते. त्यानुसार ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार असतात त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो. आज विधानसभेत काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक आमदार असल्याने काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होईल. पुढच्या आठवड्यात तु्म्हाला विरोधी पक्षांचा नेता पाहायला मिळेल, असं देखील नाना पटोले म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in