"...ही तर मोठी हराxxखोरी", कुणबी जात प्रमाणपत्रावरुन बच्चू कडूंची आक्रमक प्रतिक्रिया

मराठा हाच कुणबी आहे, अशी भूमिका बच्चू कडून यांंनी यावेळी मांडली.
"...ही तर मोठी हराxxखोरी", कुणबी जात प्रमाणपत्रावरुन बच्चू कडूंची आक्रमक प्रतिक्रिया

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यान अनेकांना काळजी वाटू लागली आहे. यावर आता प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी जरांगे पाटील यांची भेट घेवून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या भेटीत बच्चू कडू यांनी जरांगे यांनी औषधोपचार घेण्याची विनंती केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाध साधला. असा प्रामाणिक कार्यकर्ता समाजाला मिळत नाही. निस्वर्थी भावनेतून जरांगे यांनी मोठा लढा उभा केला आहे. कुठल्याही समाजाला असा कार्यकर्ता सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती चांगली रहावी, असं बच्चू कडू म्हणाले.

आमदार बच्चू कडू म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चांगली रहावी त्यांनी पुन्हा लढण्यासाठी उभं राहावं, असं मला वाटतं, असं मला वाटतं. मी काल त्यांच्याशी बोललो ते मला म्हणाले, आरक्षणासमोरच्या अडचणींवर चर्चा झाली पाहिजे. सरकार हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करतंय? याची सर्वांना माहिती असायला हवी. मी त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असलेले तज्ज्ञ आणि मनोज जरांगे पाटील तसंच त्यांचे सहकारी यांच्यात चर्चा व्हायला हवी. काही किंतू-परंतु असतील तर ते या चर्चेद्वारे समजून घेता येतील. त्यानंतर सरकार म्हणून आपले मंत्री जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करुन त्यांना आश्वस्त करतील.

बच्चू कडून पुढे बोलताना म्हणाले की, मराठा हाच कुणबी आहे. मराठा हा कुणबी नाहीतर मग कोण आहे. त्याचं उत्तर सर्वपक्षीयांपैकी कोणाकडे असेल तर ते त्याने सांगावं. एवढी मोठी नालायकी कोणी करत असले तर ते चुकीचं आहे. हा अन्याय आहे. मराठा हा कोणी लक्षलवादी नाही, व्यापारी नाही. शंभर टक्के मराठा मजूर किंवा कुणबी आहे. एवढं असूनही एवढं खोटं बोलावं. मराठा कुणबी नाही असं म्हणावं...मराठा हा ओबीसी नाही हे दरडावून सांगावं..ही खूप मोठी हराxxखोरी आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in