Rahul Gandhi: तीन राज्यांतील पराभवावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया; पराभव स्वीकारत म्हणाले, "विचारधारेची लढाई..."

राहुल यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे.
Rahul Gandhi: तीन राज्यांतील पराभवावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया; पराभव स्वीकारत म्हणाले, "विचारधारेची लढाई..."
Published on

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकाल जाहीर होत आहेत. यापैकी तीन राज्यात भापचा विजय तर काँग्रेसचा पराभव झाल्यात जमा आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाचा पराभव स्विकारला आहे.

राहुल यांनी ट्विट करत आपली भुमिका मांडली आहे. त्यांनी म्हटलं, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील जनादेश आम्ही नम्नपूर्वक स्वीकारतो. ही विचारधारेची लढाई मात्र सुरुच राहील, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

यासोबतच राहुल यांनी तेलंगणातील जनतेचे आभार मानले आहेत. सर्वसामान्यांचं सरकार स्थापन करण्याचं वचन आम्ही जरुर पूर्ण करु. सर्व कार्यकर्त्यांना त्यांची मेहनत आणि समर्थनासाठी मनापासून धन्यवाद देतो. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in