अजित पवारांची मंत्री शंभूराज देसाईंवर विखारी टीका; म्हणाले...

कराड चिपळून रस्त्याचे काम किती वर्ष सुरु आहे, इथला आमदार काय करतोय? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे
अजित पवारांची मंत्री शंभूराज देसाईंवर विखारी टीका; म्हणाले...

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या रोखठोक बोलण्यामुळे नेहमी चर्चेत असतात. आता अजित पवार यांनी शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली आहे. कराड चिपळून रस्त्याचे काम किती वर्ष सुरु आहे, इथला आमदार काय करतोय? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, जरा काही झाल की टीव्हीच्या पुढे बोलण्याचा मक्ता यालाच दिला आहे. शिंदे साहेबांवर बोलले तही हीच भू..भू..भू. कुणावरही झाल की यांनीच बोलायचे, माणसाने सत्ता आली की सत्तेची नशा चढू द्यायची नसते, अशी टीका अजित पवार यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केली आहे.

मंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण बाजार समितीच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे नेते विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाड्यासमोर शड्डू ठोकला होता, यावरून अजित पवर यांनी देसाई यांना टोला लगावला आहे. शड्डू ठोकून विकासकामे होत नाहीत, आपली तब्बेत काय, आपण करतोय काय? असे म्हणत त्यांनी शंभूराज देसाई यांची खिल्ली उडवली आहे.

logo
marathi.freepressjournal.in