नव्या जाहिरातीवरुन अजित पवारांची शिंदे गटावर टीका; म्हणाले, "हा तर.."

आजच्या जाहिरातीतून शिंदे गटाने सुरु असलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
नव्या जाहिरातीवरुन अजित पवारांची शिंदे गटावर टीका; म्हणाले, "हा तर.."

शिवसेनेकडून (शिंदे गट) १३ जून रोजी राज्यातल्या प्रमुख वर्तमानपत्रात एक जाहिरात प्रकाशित केली गेली. काल दिवसभर राजकीय वर्तूळात या जाहिरातीची चर्चा सुरु होती. यानंतर आज शिंदे गटाकडून आणखी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीतून शिंदे गटाने सुरु असलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. काल शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसल्यानं चर्चांना उधान आलं होतं. मात्र, आज प्रसिद्ध झालेल्या जाहिरातील दिवंगत बाळासाहेर ठाकरे, दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेच्या ९ मंत्र्याचे फोटो छापले आहेत. सुरु असलेली चर्चा थांबावी या हेतूनं ही जाहिरात दिली आहे. मात्र, आजच्या जाहिरातून चर्चा वाढताना दिसून येत आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी आजच्या जाहिरात शिवसेनेच्या ९ मंत्र्यांची माळ लावली आहे. मग भाजपच्या मंत्र्यांचे फोटो का नाही लावले? या ९ मंत्र्यांपैकी ५ मंत्र्यांवर सातत्यानं वेगवगेळ्या क्षेत्रातील लोक, राजकीय पक्षाचे लोक तसंच मीडिया प्रश्न उस्थित करत आहे. या वादग्रस्त मंत्र्यांविषयी माध्यमांवर सातत्यानं बातम्या येत आहेत, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसंच या वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न तु्म्ही केलाय का? असा सवाल तुम्ही उपस्थित केला आहे. शिंदे गटाने या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजे असं देखील ते म्हणाले आहेत.

तसंच अजित पवार यांनी काल १३ जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केला. काल उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील द्यायला हवी होती, ती त्यांनी दिली नाही. असं म्हणत त्यांनी मागच्या वेळी (२०१४ आणि २०१९ ची विधानसभा) 'देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' ही घोषणा दिली होती. त्याचं काय झालं? या बद्दल कुठेच काही उल्लेख करायला तयार नाहीत, अशी टीका पवार यांनी यावेळी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in