Ajit Pawar : अखेर अजित पवारांनी मौन सोडलं ; मीरा बोरवणकर यांनी केलेल्या कथित आरोपांबाबत म्हणाले...

यासाठी त्यांनी सन २००८ मध्ये शासनानं काढलेला एक जीआरचं सादर केला
Ajit Pawar : अखेर अजित पवारांनी मौन सोडलं ; मीरा बोरवणकर यांनी केलेल्या कथित आरोपांबाबत म्हणाले...
Published on

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यार गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामुळे अजित पवार अडचणीत आल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील अजित पवार यांना कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकातून कथीतरित्या करण्यात आलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर स्पष्टीकर दिलं आहे. यासाठी त्यांनी सन २००८ मध्ये शासनानं काढलेला एक जीआरचं सादर केला. तसंच आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

माजी आयपीएस अधिकारी आणि पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकार अजित पवारांवर पुण्यातील येरवड्यातील जागा हस्तांतरीत करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आता अजित पवारांनी देखील आपल्यावर केकेल्या आरोपांबाबत मौन सोडलं आहे. याप्रकरणावर अजित पवारांनी आपली प्रक्रिया दिली आहे.

आपल्यावर केलेल्या कथिक आरोपांबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "अनेक वर्ष मी पुण्याचा पालकमंत्री होतो. पालकमंत्री या नात्यानं जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या काही आढावा बैठका घ्यायच्या असतात. एका रिटायर्ड आयपीएस अधिकाऱ्यांनी एक पुस्तक लिहिलं त्यानुसार मीडियात बातम्या आल्या की, अजित पवार अडचणीत त्यांच्यावर कारवाई करा. पण मी यात काहीही केलेलं नाही", असं अजित पवार यांनी सांगितलं.

logo
marathi.freepressjournal.in