
राज्यात सध्या प्रत्येक गटात वाद सुरु आहे. पक्षात फुट पाडायचं काम सध्या सुरु आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख ' लबाड लांडगा' असा केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख 'लबाड लांडगा' असा केल्याने त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होतं आहे. पडळकरांविरोदात राष्ट्रवादी काँग्रेसच पक्ष (अजित पवार गट) आक्रमक झाला असून राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन केली जात आहेत. आता गोपीचंद पडळकरांना काळं फासा आणि एक लाख मिळवा, अशी घोषणा अजित पवार यांच्या गटातील नागपूर शहरांध्यक्षांनी केली आहे.
अजित पवार गटाचे नागपूरचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी 'टीव्ही ९ मराठी' या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की , "गोपीचंद पडळकर जिथं दिसतील तिथं त्यांना भर चौकात जोड्यानं मारावं आणि नंतर पडळकरांच्या तोंडाला काळं फासावं. त्यांना जो काळं फासेल त्याला एक लाख मिळणार, असं आवाहन त्यांनी केलं आहे. पडळकरांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय ते सुधारणार नाहीत. नागपूरला आल्यावर पडळकरांना आम्ही सोडणार नाहीत. पडळकरांनी नागपूरला येऊ नये आणि जर आलात तर मार खाल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही ," असा इशारा प्रशांत पवार यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.
काय म्हणाले होते पडळकर?
धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही अजिबात मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही त्यांना पत्र देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकेल, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे," असं गोपीचंद पडळकरांनी यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार गट आक्रमक झाला आहे.