गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे आणखी भर पडली आहे. शरद पवार हे कालपर्यंत अजित पवार गटाच्या विरोधात दंड थोपटत होते. मात्र, आज त्यांनी केलेल्या विधानामुळे सर्वजण संभ्रमात पडले आहेत. आज बारामती येथे पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, पक्षातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगलेच त्याला पक्षात फूट पडली असं म्हणू शकत नाही. असं म्हणत शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या मताचं समर्थन केलं आहे. दादा आमचे नेते आहेत असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचं शरद पवार यांनी समर्थनचं केलं होतं. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधान आलं आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यामांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडली नसून दादा आमचेच नेते असल्याचं म्हटलं होतं. यावरुन माध्यम प्रतिनिधींनी पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. अजित पवार आमचेच नेते आहेत. त्यात काही वाद नाही. फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते, देशपातळीवर जेव्हा एखादा मोठा वर्ग वेगळा झाला. इकडे अशी स्थिती नाही. काही लोकांनी पक्ष सोडला तर काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. लोकशाहीत त्यांना तो अधिकार आहे.त्यांनी घेतलेल्या वेगळ्या निर्णयावरुन लगेच फूट म्हणायचं काही कारण नाही. तो त्यांचा निर्णय आहे, असं शरद पवार म्हणाले.
बीडमध्ये घेतलेल्या सभेनंतर उत्तर सभा घेण्यावर देखील ते बोलेले. ते म्हमाले की, बीडमधील माझ्या सभेनंतर जर कोणी आपली भूमिका मांडण्यासाठी येत असेल तर त्याचं लोकशाहीमध्ये स्वागत आहे. वेगळी भूमिका घेणारे लोक त्यांची भूमिका लोकांमध्ये जाऊन मांडत आहेत याचा मला आनंद आहे, असं देखील पवारांनी म्हटलं.
आगामी निवडणूकांच्या सर्व्हेबाबत देखील ते बोललेल. वेगवेगळ्या संस्थांनी केलेले निवडणूक सर्व्हे याबाबत मला काही माहिती नाही. मात्र, आम्ही ज्या संस्थांची बोलतो आहोत त्यातून महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे, असं पवार म्हणाले.