"...तेव्हा अजित पवारांनी मंचावरुन उठून जायला हवं होतं.", मोदींनी केलेल्या टीकेवर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

"...तेव्हा अजित पवारांनी मंचावरुन उठून जायला हवं होतं.", मोदींनी केलेल्या टीकेवर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा प्रश्न मोदींनी सभेतून उपस्थित केला होता

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्र दौरावर होते. या दौऱ्यादरम्यान मोदी यांनी शिर्डीजवळील काकडी गावात जाहीर जनसभा घेतली. या सभेत मोदींनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा प्रश्न मोदींनी सभेतून उपस्थित केला. सर्वात महत्वाची गोस्ट म्हणजे, मोदींनी शरद पवार यांच्यावर टीका केली त्यावेळी मंचावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. ज्यावेळी नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका केली. त्यावेळी अजित पवारांनी मंच सोडून जायला हवं होतं किंवा मोदींच्या प्रश्नाला उत्तर द्यायला हवं होतं, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी पुढे म्हटलं की, "२०१३ मध्ये मोदींनी काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांच्या शेती आणि त्यांच्या शेतीबद्दलच्या कामाची प्रशंसा केली होती. शरद पवार यांच्या प्रयत्नमुळे शेती पिकांच्या हमी भावामध्ये वाढ झाल्याच मोदी त्या मुलाखतीत बोलले होते. त्यावेळी मोदींनी शरद पवार यांना देवदूत म्हटलं होतं. मग कालच्या सभेत असं का बोलले? कदाचित निवणूका जवळ आल्या आहेत. त्यामुळे ते असं बोलले असतील" असं अनिल देशमुख म्हणाले.

नरेंद्र मोदींनी शरद पवार यांनी टीका केली तरी अजित पवार गटात काही हालचाल दिसत नाही. त्यांनी अद्यापही मौन बाळगलं आहे. मोदींच्या वक्त्यावर अजून अजित पवार यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. शरद पवार यांच्या गटाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या टीकेवर मात्र प्रतिउत्तर देण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडून मोदींना २०१५ च्या बारामतीतील भाषणाची आठवण करून देणारं ट्वीट करण्यात आलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in