अजित पवार एकदिवस नक्की उठाव करतील - संजय शिरसाट

त्यांची इमेज वाढली तर आपल्या इमेजला धक्का बसेल ही त्यामागची भूमिका
अजित पवार एकदिवस नक्की उठाव करतील - संजय शिरसाट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी भर कार्यक्रमात मला विरोधी पक्षनेते पद नको, मला या जबाबदारीतून मुक्त करुन पक्षाची जबाबदारी द्या. असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तूळात चांगलीच खळबळ उडाली. त्यांच्या या विधानाचे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यावर शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांकडे पक्षाची जबाबदारी दिली जाईल असं वाटत नसल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीतील काही नेत्यांचा अजित पवारांना विरोध आहे. त्यांना पक्षाचा प्रमुख करणं हे काही नेत्यांना परवडणारं नाही. म्हणून अजित पवार यांना डावललं असल्याचं वक्तव्य संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

याबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, अजित पवार मुख्यमंत्री पदाचे दावेदार असून ते त्यांच्याच पक्ष मेळाव्यात मला विरोधी पक्षनेतेपद नको, पक्षाची जबाबदारी द्या. अशी विनवणी करतात, हे केविलवाच झालं. त्यांनी जेव्हा याबाबत मागणी केली. तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून दाद दिली. याचा अर्थ राष्ट्रवादीला पुढे घेऊन जायचं काम कोणी करेल तर ते अजित पवार करतील. पण अजित पवार यांना पक्षाची जबाबदारी दिली जाईल, असं मला वाटत नाही. आपला पक्ष अजित पवारांच्या हातात देणं काही जणांना परवडणारं नाही. असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. तसंच ते लोक अजित पवारांबाब आदर आणि आत्मियता दाखवतात मात्र प्रत्यक्षात त्यांच्या विरोधात काम केलं जात असल्याची त्यांनी सांगितलं आहे.

यावेळी शिरसाट यांनी गेल्यावेळी अजित पवार यांना मुख्यमंत्री पद मिळणार होतं. पण राष्ट्रवादीने ते स्व:ताहुन काँग्रेसच्या गळ्यात टाकलं. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर कोणतं आभाळ कोसळणार होतं. पण त्यांची इमेज वाढली तर आपल्या इमेजला धक्का बसेल ही त्यामागची भूमिका होती. असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी अजित दादा एक दिवस उठाव करतील असं माझं मत आहे, असं देखील शिरसाट म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in