राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार(Ajit pawar) गटाने बीड(Beed) येथे घेतलेल्या सभेवरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. या सभेत मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या टीकेवरुन त्यांना ट्रोलिंगला समोरं जावं लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून भुजबळांचा निषेध केला जात असून त्यांच्या विरोधात आंदोलन देखील केलं जातं आहे. ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांचा गद्दार असा उल्लेख करत त्यांच्या पुतळ्याला जोडे मारुन दहन केलं आहे.
या पार्श्चभूमीवर छगन भुजबळ यांनी केलेली टीका अजित पवार यांना पटली का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर मला भुजबळांचं भाषण ऐकूच आलं नाही, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं आहे. अजित पवार हे स्पष्टीकरण देत म्हणाले की, मी जिथं बसलो होतोस तिथं माईक सिस्टिम अशी होती की, समोरच्या पब्लिकला ते ऐकायला जात होतं. पण मला भाषण नीट ऐकू येत नव्हतं. कार्यक्रम संपल्यानंतर मी बीडवरुन औरंगाबाद आणि तेथून पुण्याला जात होतो. तेव्हा सोशल मीडियात मला काही बातम्या पहायला मिळाल्या. वस्तुस्थिती काय झाली याबाबत माझा अद्याप भुजबळांना फोन झालेला नाही. माझे पुण्यात सकाळी काही कार्यक्रम होते.
यावेळी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, "एकमंदरीतचं माझं स्पष्ट आहे की, राजकीय जीवनात काम करत असताना आपण आपली भूमिका अतिशय ठामपणे मांडण्याचं काम केलं पाहिजे. परुंतु ती मांडत असताना कोणच्या भावना दुखावणार नाहीत याची पण काळजी घेतली पाहिजे."